कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:15 IST2020-04-24T16:11:00+5:302020-04-24T16:15:02+5:30
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यक निधीला २५ लाख रुपयांची मदत केली होती आणि आता एका संस्थेला १५ लाखांची मदत केली आहे.

कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या व्हायरमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यक निधीला २५ लाख रुपयांची मदत केली होती. त्यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. लता मंगेशकर यांनी ट्विट केले होते की, नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ती मदत करावी.
नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 31, 2020
लता मंगेशकर यांनी २५ लाखांची मदत केल्यानंतर आता एका संस्थेला पंधरा लाखांची मदत केली आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे की, आज माझे वडील दिनानाथ मंगेशकर यांची ७८ वी पुण्यातिथी असून कोरोनाच्या संकटामुळे आम्ही कोणताही कार्यक्रम आज आयोजित केलेला नाहीये. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला कोणताही कार्यक्रम होत नसल्याचे मला दुःख होत आहे. या वर्षी आम्ही या दिवसाच्या निमित्ताने दिनानाथ फाऊंडेशनच्या वतीने प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाऊंडेशनला पाच लाख रुपये आणि माझ्याकडून दहा लाख रुपयांचा निधी सुपूर्त करत आहोत.
आज मेरे परमपूज्य पिताजी मास्टर दीनानाथ मंगेशकर जी की 78वी पुण्यतिथि है.इस साल हम कोरोना की वजह से पुण्यतिथि का कार्यक्रम नहीं कर सके इसका हमें दुख है.इस साल हम दीनानाथ प्रतिष्ठान की तरफ़ प्रीति पाटकर जी की प्रेरणा फ़ाउंडेशन को पाँच लाख और मेरी तरफ़ से दस लाख की राशि दे रहे हैं. pic.twitter.com/ar8VXM1hEq
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 24, 2020