किशोर कुमार यांच्या 'त्या' सवयीला कंटाळल्या होत्या लता मंगेशकर, एकत्र काम करण्यास दिला होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 13:20 IST2022-02-06T13:20:00+5:302022-02-06T13:20:00+5:30
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी त्यांच्या ८० वर्षांच्या कारकिर्दीत ५००० हून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांनी अनेक संगीतकारांसोबत स्टेज शेअर केला आहे.

किशोर कुमार यांच्या 'त्या' सवयीला कंटाळल्या होत्या लता मंगेशकर, एकत्र काम करण्यास दिला होता नकार
लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आज लतादीदींचं दु:खद निधन झालं. ८० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ५००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत चार चाँद लावले आहेत. लता मंगेशकर यांनी अनेक संगीतकारांसोबत स्टेज शेअर केले आहे.
अनेक गायकांसोबत म्युझिक अल्बममध्ये एकत्र काम केले आहे आणि त्यापैकी एक होते किशोर कुमार (Kishore Kumar). किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांची जोडीचे गाणे एकत्र ऐकायला लोकांना खूप आवडले. दोघांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की एकवेळ अशी आली होती की दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. लता मंगेशकर यांनी किशोर कुमारसोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
किशोर कुमार यांच्यासोबत काम करत असताना लता मंगेशकर यांना त्यांच्या एका सवयीचा त्रास होऊ लागला. ती सवय म्हणजे किशोर कुमार यांचा खोडकरपणा.. होय, लता मंगेशकर त्यांच्या विनोद करण्याच्या सवयीला कंटाळल्या होत्या आणि या गोष्टीचा खुलासा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)मध्ये झाला होता. जेव्हा समीर कपिलच्या शोमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
गीतकार समीर (Sameer) यांनी सांगितले, एकदा लताजींनी मला किशोर कुमारशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. लताजी आणि आशा भोसले यांनी किशोर कुमार यांच्या विनोदी वृत्तीला कंटाळून त्यांच्यासोबत गाणं बंद केले होतं. लताजी म्हणाल्या होत्या की किशोर काय करतो, येतो आणि आम्हा दोघांशी बोलतो विनोद करतो किंवा जोक्स सांगतो आणि आम्हाला खूप हसवतो. त्यामुळे आपला आवाज थकून जातो आणि स्वत: गाऊन गायब होतो. आम्ही म्हटलं की याला गाऊ द्या, मी त्यांच्यासोबत गाणार नाही.
समीर यांनी पुढे सांगितले की, खूप दिवसांनी संधी आली की दोघांनाही एकत्र गाण्याची गरज आहे. नाहीतर प्रॉब्लेम होईल. लताजी येताच किशोर कुमार यांनी त्यांना गाठले आणि किस्सा सांगू लागले, त्यांनी सांगितले की, मी किस्सानंतर ऐकते,आधी मला गाणं गाऊ द्या.