अखेर अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीचे ठरले लग्न, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच उरकला होता साखरपुडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 19:07 IST2017-10-24T12:58:18+5:302017-10-24T19:07:08+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची एक ट्रेडिशनल अ‍ॅड समोर आली होती. ...

Lastly, Anushka Sharma and Virat Kohli's marriage, last year, was a resident of December last year! | अखेर अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीचे ठरले लग्न, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच उरकला होता साखरपुडा!

अखेर अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीचे ठरले लग्न, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच उरकला होता साखरपुडा!

ही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची एक ट्रेडिशनल अ‍ॅड समोर आली होती. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, हे दोघे लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. याचदरम्यान एक बातमी समोर आली होती की, हे कपल प्रत्यक्षात हे गॉसिप सत्यात उतरविण्याचा विचार करीत आहे. होय, एका लिडिंग वेबसाइटने केलेल्या दाव्यानुसार अनुष्का आणि विराट डिसेंबर महिन्यात विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. 



या वेबसाइटनुसार अनुष्का आणि विराट या दोघांनीही लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. डिसेंबर २०१६ मध्येच दोघांचेही परिवार एकमेकांना भेटले होते. त्यानंतर या कपलने खासगीत साखरपुडा उरकला. आता दोघांच्या लग्नाच्या बातमीमुळे त्या साखरपुड्याच्या जुन्या गॉसिपला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौºयावर जाणार आहे. या दौºयात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी-२० सीरिज खेळली जाणार आहे.



मात्र, या दौºयातून विराटने बीसीसीआयकडे ब्रेक मागितल्याने त्याच्या लग्नाच्या बातमीला आणखीच बळकटी मिळत आहे. त्याने हा ब्रेक लग्नासाठीच मागितल्याची सध्या चर्चा रंगत आहे. श्रीलंका दौºयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौºयावर जाणार आहे. त्यामुळे विराटकडे लग्नासाठी पुरेसा वेळ नसणार आहे. त्यामुळेच विराट आणि अनुष्का डिसेंबरमध्येच लग्न उरकण्याची तयारी करीत आहेत.  



२०१६ च्या सुरुवातीलाच अनुष्का आणि विराटचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. त्यादरम्यान अनुष्का सलमान खानसोबत ‘सुलतान’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. त्यानंतर या दोघांनी त्यांच्यातील गैरसमज दूर करून पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्काची लव्हस्टोरी २०१३ मध्ये एका शॅम्पू अ‍ॅडच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली. आता या दोघांनी लवकरच विवाहाच्या बंधनात अडकावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. 

Web Title: Lastly, Anushka Sharma and Virat Kohli's marriage, last year, was a resident of December last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.