हे आहे उर्वशीच्या 24 कॅरेट सोन्यानं मढवलेल्या आयफोनचं लास्ट लोकेशन, फोन शोधून देणाऱ्यास मिळणार बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 07:01 PM2023-10-17T19:01:48+5:302023-10-17T19:02:52+5:30

अभिनेत्री उर्वशीने आयफोन शोधून देणाऱ्याला बक्षिस द्यायचं ठरवलंय.

last location of Urvashi's 24 carat gold-plated iPhone | हे आहे उर्वशीच्या 24 कॅरेट सोन्यानं मढवलेल्या आयफोनचं लास्ट लोकेशन, फोन शोधून देणाऱ्यास मिळणार बक्षिस

हे आहे उर्वशीच्या 24 कॅरेट सोन्यानं मढवलेल्या आयफोनचं लास्ट लोकेशन

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. गृहमंत्री अमित शाहांसह अनेक सेलिब्रिटीही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील भारत-पाक सामन्याला हजेरी लावली होती. पण, हा सामना तिला खूपच महागात पडला.  मॅच पाहताना उर्वशीने तिचा आयफोन गमावला आहे. तिचा हा आयफोन साधासुधा नाही तर 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा होता. पोलिस तिचा फोन शोधत असून तो अद्याप सापडलेला नाही. 

आयफोन शोधून देणाऱ्याला उर्वशी बक्षिस देणार आहे. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच तिनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. यात तिनं म्हटलं, 'आम्ही तुम्हाला बक्षिस देऊ, फोनचं शेवटचं लोकेशन हे मॉलमध्ये होतं'. 

भारत-पाकिस्तानमध्ये रंगलेला सामना बघायला गेलेल्या उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अनेक व्हिडिओ शेअर केले होते. यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. उर्वशीचं नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर उर्वशी पाकिस्तानी क्रिकेटरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता फोन हरवल्यामुळे उर्वशी पुन्हा चर्चेत आली आहे. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. त्यांच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. लवकरच ती काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्याची तिचे चाहते खूप वाट पाहत आहेत.

Web Title: last location of Urvashi's 24 carat gold-plated iPhone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.