भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:50 IST2017-09-09T10:18:50+5:302017-09-09T15:50:15+5:30

लागोपाठ दोन चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा भलत्याच कारणांनी चर्चेत आहे. होय, भूमीने वैवाहिक जीवन आणि ...

The land says PEDNekar, what is wrong with sex before marriage ?, they do everything! | भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!

भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!

गोपाठ दोन चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा भलत्याच कारणांनी चर्चेत आहे. होय, भूमीने वैवाहिक जीवन आणि सेक्सवर अतिशय बिनधास्तपणे विचार मांडल्याने, अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटात अतिशय दमदार भूमिका करणाºया भूमीचे हे विचार खूपच परखड असल्याच्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या भूमीने म्हटले की, लग्नाअगोदर सेक्स करणे खूपच सामान्य बाब आहे. हल्ली तर सर्वच बंद दरवाजा मागे हे सर्व करतात. माझ्या मते, ही काही खूप मोठी बाब नाही. फरक केवळ ऐवढाच लग्नाअगोदर केलेल्या सेक्सची आपण कुठेही वाच्यता करीत नाही. इतरांपासून ते लपवून ठेवतो. वास्तविक आपणच याचा अतिरेक केल्याने ही बाब लपवून ठेवावी लागत असल्याचेही भूमीने म्हटले. भोपाळ येथे आयोजित इंडिया टुडेच्या यूथ कॉन्क्लेव्ह माइंड रॉक्समध्ये भूमी पोहोचली होती. यावेळी तिने तिच्या करिअरशी संबंधित आणि व्यक्तिगत जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचे खुलासे केले. 



भूमीने म्हटले की, ‘कोणत्याही रिलेशनशिपच्या यशस्वीतेचे रहस्य केवळ इमोशन किंवा फिलिंग्स नसतात, तर कुठलेही परफेक्ट रिलेशन ५० टक्के फिजिकल असतेच, तर उर्वरित ५० टक्के इमोशनवर आधारित असते. हल्लीच्या तरुण-तरुणींना करिअर व्यतिरिक्त सर्वांत जास्त जर कुठली चिंता सतावत असेल तर ते रिलेशनशिप्सशी निगडीत आहे. यावर बोलताना भूमीने म्हटले की, जोपर्यंत आपण स्वत:वर प्रेम करीत नाही, तोपर्यंत तुमचा पार्टनरही तुम्हाला प्रेम करू शकत नाही. 

भूमीने ‘दम लगा के हइशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पहिल्याच चित्रपटात ती फॅट मुलीच्या भूमिकेत बघावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी अक्षयकुमारसोबतच्या तिच्या ‘टायॅलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली, तर गेल्या आठवड्यात आयुष्यमान खुराणा याच्यासोबतच्या तिच्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटानेही बॉक्स आॅफिसवर सरासरी कमाई केली आहे. भूमी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात तिच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. भूमीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. 

Web Title: The land says PEDNekar, what is wrong with sex before marriage ?, they do everything!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.