भूमी म्हणते,‘चित्रपट हे प्रभावी माध्यम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 18:45 IST2017-01-08T18:45:29+5:302017-01-08T18:45:29+5:30
‘दम लगा के हैशा’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. या चित्रपटात तिने वजनदार महिलेची भूमिका साकारली ...
.jpg)
भूमी म्हणते,‘चित्रपट हे प्रभावी माध्यम’
‘ म लगा के हैशा’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. या चित्रपटात तिने वजनदार महिलेची भूमिका साकारली होती. सध्या ती ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती म्हणते,‘चित्रपट हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. जनतेसोबत संपर्क साधण्याचं हे उत्तम माध्यम म्हणावं लागेल.’
![]()
‘दम लगा के हैशा’ या चित्रपटामध्ये अभिनेता आयुषमान खुरानासोबत तिने उत्तम अभिनय साकारला होता.
‘दम लगा कै हैशा’ नंतर भूमीने फार थोड्या अवधीत तिचं वजन घटवलं. त्यामुळे तिला जास्तीत जास्त प्रोजेक्टस मिळू लागले. ती सध्या अक्षय कुमारसोबत तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत असून, बॉलिवूडच्या खिलाडीसोबत काम करताना फार चांगला अनुभव आल्याचे ती सांगते. फेम आणि स्टारडम यांच्यामुळे भूमीचे नाव आता बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिला चित्रपट हे संवादाचे सर्वाेत्तम माध्यम वाटते. ती म्हणते,‘चित्रपट हे जनतेसोबत संवाद साधण्याचं खरंच खूप महत्त्वाचं माध्यम आहे. तुम्ही जर सामाजिक कामासाठी चित्रपटांचा वापर करत असाल तर कलाकारांसाठी त्यापेक्षा मोठं गिफ्ट ते काय असेल? ‘टॉयलेट -एक प्रेमकथा’ हा सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. सुंदर लव्हस्टोरी सामाजिक संदेशांसह मांडण्यात आली आहे.’
![]()
‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर.