भूखंड देता का भूखंड...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:56 IST2016-02-07T02:24:39+5:302016-02-07T07:56:33+5:30
- बॉलिवूडकरांना कमी किमतीत हवी जमीन अभिनेत्री-आणि खासदार असलेल्या हेमा मालिनी यांना महाराष्ट्र सरकारद्वारा मुंबईच्या अंधेरीतील ४० कोटींचा भूखंड ...

भूखंड देता का भूखंड...?
- बॉलिवूडकरांना कमी किमतीत हवी जमीन
अभिनेत्री-आणि खासदार असलेल्या हेमा मालिनी यांना महाराष्ट्र सरकारद्वारा मुंबईच्या अंधेरीतील ४० कोटींचा भूखंड केवळ ७० हजार रुपयात देण्यात आल्याने सध्या गहजब माजला आहे. परंतु शासनाला जमीन मागणाºया हेमा मालिनी काही एकट्या नाहीत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज महाराष्ट्र सरकार कडे वेगवेगळ्या कारणांसाठी जमीन मागून चुकले आहेत. यात सुभाष घईदेखील आहेत. त्यांना मुंबईच्या गोरेगांव फिल्मसिटीमध्ये फिल्म इंस्टिट्यूटसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखतर्फे जमीन देण्यात आली होती. घईने तिथे विसलिंग वुड्स नावाचे एक विशाल इंस्टिट्यूट उघडले. मात्र यावरून नंतर खूप वाद- विवाद झाले, प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले. न्यायालयाने या व्यवहारावर प्रश्न उपस्थित करून इंस्टिट्यूटची इमारत पाडण्याचे आदेश दिले. या आदेशाने सुभाष घर्इंचे हे इंस्टिट्यूट मोठ्या संकटात आले होते. त्यावेळी बॉलिवूडचे कित्येक स्टार्स घर्इंच्या समर्थनासाठी पुढे आले आणि हे प्रकरण शांत झाले. याच क्रमातील अक्षय कुमारचे प्रकरण मनोरंजक आहे. दहा वर्षांपूर्वी अक्षय कुमारने कराटे ट्रेनिंग सेंटरसाठी राज्य सरकारकडे जमीन मागितली होती. सरकारने मुंबई जवळील भायंदरमध्ये जमीन देण्याचा प्रस्ताव दिला. ज्याला अक्षयने नाकारले होते. त्याला मुंबई शहराच्या आत बांद्रा ते अंधेरी दरम्यानची जमीन हवी होती. असे न झाल्याने त्याने प्रस्ताव मागे घेतला आणि आपल्या योजना कायमची बंद के ली.