शाहरुख खानच्या नावाने चंद्रावर विकत घेतलीय जमीन, चाहतीचं खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:04 IST2025-01-08T10:03:27+5:302025-01-08T10:04:07+5:30
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये शाहरुखची अशी एक फॅन आहे, जी ती शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी खास करत असते.

शाहरुख खानच्या नावाने चंद्रावर विकत घेतलीय जमीन, चाहतीचं खास गिफ्ट
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan)ची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये शाहरुखची अशी एक फॅन आहे, जी ती शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी खास करत असते. ही चाहती भारताची नसून ऑस्ट्रेलियाची आहे. शाहरुखच्या या चाहतीचे नाव सँडी आहे. सँडीने शाहरुखला चंद्रावर पहिला हिंदी चित्रपट अभिनेता बनवण्यासाठी त्याच्या नावावर जमीन खरेदी केली आहे. इतकेच नाही तर शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ती दरवर्षी काहीतरी खास करते.
रिपोर्टनुसार, चंद्रावरील ज्या जागेवर सॅन्डीने जागा विकत घेतली आहे त्याला सी ऑफ ट्रँक्विलिटी म्हणतात. शाहरुख खानने २००९ मध्ये झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. लूनर रिपब्लिक सोसायटी (एलएसआर) कडून दरवर्षी यासाठी प्रमाणपत्र मिळते, असे अभिनेत्याने सांगितले होते. शाहरुख खान म्हणाला होता की, ''दरवर्षी माझ्या वाढदिवसाला एक ऑस्ट्रेलियन महिला माझ्यासाठी चंद्रावर थोडी जमीन खरेदी करते. ती काही काळापासून ते विकत घेत आहे आणि मला लूनर रिपब्लिक सोसायटीकडून त्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ती मला रंगीत ईमेल लिहिते. यामध्ये, एक रेषा लाल आहे, एक निळी आहे आणि असेच कलर असतात."
चाहतीने २००२ मध्ये केले होते हे काम
शाहरुख खान पुढे म्हणाला, "जगभरातील अनेक लोकांचे प्रेम मिळाल्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो." २००२ मध्ये महिलेने शाहरुखच्या नावावर स्कोर्पियन नक्षत्रातील एका ताऱ्याचे नाव ठेवले होते. शाहरुख हा पहिला भारतीय अभिनेता ठरला ज्याच्या नावावरही स्टार आहे. सँडी अजूनही शाहरुखसाठी काहीतरी खास करण्याचा विचार करत आहे. कदाचित, किंग खानच्या पुढच्या वाढदिवसाला सँडी सूर्याशी संबंधित एक सरप्राईज गिफ्ट देईल.