‘लेडिज रुम’चे ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:02 IST2016-05-10T15:31:41+5:302016-05-10T21:02:09+5:30

लेडिज रुम’चे पहिले ट्रेलर यूट्यूबवर दाखल झाले असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

Ladies Room's Trailer Launch | ‘लेडिज रुम’चे ट्रेलर लाँच

‘लेडिज रुम’चे ट्रेलर लाँच

ब सिरिजचे भारतामध्ये प्रस्थ वाढताना दिसत आहे. वाय फिल्म्सची पुढची वेब सिरिज ‘लेडिज रुम’चे पहिले ट्रेलर यूट्यूबवर दाखल झाले असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. 

गेल्या महिन्यात बहुचर्चित पोस्टर रिलिज करून ‘लेडिज रुम’ने चांगलीच हवा निर्माण केली होती. यशराज बॅनरच्या इतिहासातील सर्वात बोल्ड आणि बेधडक ट्रेलर म्हणून याकडे पाहिले जात आहे.

शिव्या आणि काही बाथरुम सीन्स तर एवढ भन्नाट आहे की, ते पाहून हसूदेखील येते आणि किळस येते. अशा प्रकारच्या भावना पाहण्याºयांमध्ये निर्माण करण्यास ट्रेलर नक्कीच यशस्वी झाले आहे.

‘लेडिज रूम’ ही दोन जिवलग मैत्रिणींची कहाणी आहे. सहा वेगवेगळ्या लेडिज वॉशरूमध्ये या दोघींना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याचीच ही कथा आहे. डिंगो आणि खन्ना अशा या दोन मुली एकापाठोपाठ एक अशा संकटात सापडतात आणि त्यांना पुरून उरतात, अशी ही कथा आहे. 

सबा आझाद हिने लेडिज रूममध्ये डिंगोची व्यक्तिरेखा साकारली आहे तर श्रेया धनवन्तरी ही खन्नाच्या भूमिकेत आहे.

Web Title: Ladies Room's Trailer Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.