'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 13:55 IST2021-03-10T13:54:31+5:302021-03-10T13:55:15+5:30
काही दिवसांपूर्वी चेहरे चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे ज्यात रिया चक्रवर्ती दिसत नाही. त्यामुळे क्रिस्टल डिसूझाने तिला रिप्लेस केले का, असे प्रश्न अनेकांना पडले आहे.

'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा
अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी अभिनीत चेहरे चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. त्या पोस्टरवर कुठेच रिया चक्रवर्ती दिसली नाही. मागील
वर्षी कोरोनामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. त्यात चेहरेचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. त्यात रिया चक्रवर्तीऐवजीक्रिस्टल डिसूझाचा चेहरा पहायला मिळाला. त्यानंतर क्रिस्टल डिसूझाने तिला रिप्लेस केले का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
चेहरे हा चित्रपट ३० एप्रिलला रिलीज होणार आहे. चेहरेच्या पोस्टरवर रिया चक्रवर्ती ऐवजी क्रिस्टल डिसूझाला पाहून अनेकांना रियाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला का, असे अनेकांना प्रश्न पडला आहे. क्रिस्टलने रियाला रिप्लेस केले का?, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी आरोप झेलणारी त्याची गर्लफ्रेंड रियाची भूमिका काढून टाकली का?,असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता क्रिस्टल डिसूझाने दिले आहे.
एकता कपूरची निर्मिती असलेली वेबसीरिज द मॅरिड वुमनच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी क्रिस्टलला चेहरे चित्रपटातून रिया चक्रवर्तीची भूमिका कट करण्यात आली का, असे विचारले असता क्रिस्टलने सांगितले की, नाही, मला याबद्दल काहीच माहित नाही. जेव्हा तिला विचारले की, चेहरे चित्रपटात तू रियाला रिप्लेस केलेस का, त्यावर एका शब्दात उत्तर देत क्रिस्टलने नाही म्हटले.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा तिचा पहिला चित्रपट चेहरेबद्दल खूप उत्सुक आहे. तिने याबद्दल सांगितले की, कृपया. तुम्ही सर्वांनी माझा पहिला चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा. चित्रपटातील माझा सहकलाकार इमरान हाश्मी एक समजूतदार आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली.