/>अमिताभ बच्चनचा चित्रपट ‘पिंक’ चे ट्रेलर बघून अनेकांकडून पसंती मिळत आहे. परंतु, अभिनेत्री कंगना राणौत तर हा चित्रपट बघीतल्यानंतर इतकी भावूक झाली की, ती आपले रडणे सुद्धा थांबवू शकली नाही. सोमवारी रात्री मुंबई येथे चित्रपटाची स्क्रीनिंग काही विशेष लोकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कंगनाही सहभागी झाली होती. तेथे असलेल्या एका पे्रक्षकाने सांगितले की, चित्रपट बघताना कंगना एवढी भावूक झाली होती की, ती आपल्या भावनावर नियंत्रण ठेवू शकली नाही. चित्रपट संपल्यानंतर तिला रडणे आवरले नाही. पिंक हा चित्रपट अनिरुद्ध रॉय चौधरीने दिग्दर्शित केलेला आहे. यामध्ये तीन मुलींची कहानी असून, तापसी पन्नू, किर्ती कुन्हरी व एंड्रिया टेरियांग यामध्ये भूमिका साकारत आहोत. अमिताभ यामध्ये एका वकिलाची भूमिका साकारत आहे. शुजीत सरकार व रश्मी शर्मा हे दोघे या चित्रपटाचे निर्माता आहेत.