Sana Saeed VIDEO: ‘कुछ कुछ होता है’ची छोटी ‘अंजली’ एन्गेज्ड, बॉयफ्रेन्डने असं केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:14 PM2023-01-01T15:14:31+5:302023-01-01T15:14:59+5:30

Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner : होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सना सईद हिच्याबद्दल. सनाने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरूखची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती....

Kuch Kuch Hota Hai fame Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner | Sana Saeed VIDEO: ‘कुछ कुछ होता है’ची छोटी ‘अंजली’ एन्गेज्ड, बॉयफ्रेन्डने असं केलं प्रपोज

Sana Saeed VIDEO: ‘कुछ कुछ होता है’ची छोटी ‘अंजली’ एन्गेज्ड, बॉयफ्रेन्डने असं केलं प्रपोज

googlenewsNext

 Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner : 1998 साली प्रदर्शित झालेला ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota ) आठवत असेल तर त्यातली चुलबुली छोटी अंजली देखील तुम्हाला हमखास आठवत असणार. आता ही चिमुकली बरीच मोठी झालीये आणि लवकरच लग्न करणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सना सईद (Sana Saeed) हिच्याबद्दल. सनाने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरूखची मुलगी अंजलीची  भूमिका साकारली होती. आता सनाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 
नुकतीच सना एन्गेज्ड झाली. नववर्षी   बॉयफ्रेन्ड साबा वॉनर याने सनाला अगदी रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केलं.  बॉयफ्रेन्डने अगदी गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने होकार दिल्यावर तिच्या हातामध्ये हिऱ्याची अंगठी घातली. हे पाहून सनाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने बॉयफ्रेन्डला घट्ट मिठी मारली.  

सनाने या सुंदर क्षणांचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. व्हिडीओत तर डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसतेय. 
दीर्घकाळापासून  सना साबा वॉनरला डेट करत आहे. सबा हा हॉलिवूडमध्ये साऊंड डिझायनर म्हणून काम पाहतो.  तो लॉस एंजिल्समध्ये राहतो. सना त्याच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. 

‘कुछ कुछ होता है’मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदने या चित्रपटानंतर  बादल  व हर दिल जो प्यार करेगा  चित्रपटात काम केलं. मात्र या चित्रपटानंतर सना बराच काळ रुपेरी पडद्यावर दिसली नाही.  चित्रपटांव्यतिरिक्त सना सईदने टेलिव्हिजनवरील मालिकेत काम केलं. बाबुल का आंगन छूटे ना, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस व  लाल इश्क  या मालिकेत ती दिसली. याशिवाय झलक दिखला जा 6, झलक दिखला जा 7, नच बलिए 7 आणि  झलक दिखना जा 9 या रिएलिटी शोमध्येदेखील ती दिसली होती.

2012 साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द ईयर’मध्येही सना झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. या चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट मुख्य भूमिकेत होते.सना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.   

Web Title: Kuch Kuch Hota Hai fame Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.