क्रितिका कामराची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, थिरकताना दिसणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 07:15 IST2018-08-06T12:53:44+5:302018-08-07T07:15:00+5:30
अभिनेत्री क्रितिका कामरा नितीन कक्कर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

क्रितिका कामराची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, थिरकताना दिसणार रुपेरी पडद्यावर
'कितनी मोहब्बत है', 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री क्रितिका कामरा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती नितीन कक्कर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मात्र यात ती अभिनय करताना दिसणार नसून ती नृत्य करताना दिसणार आहे.
नितीन कक्कर यांचा आगामी चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्यात आहे. यात गुजरातमधील प्रसिद्ध लोकनृत्य गरबा पाहायला मिळणार आहे आणि या गरब्याच्या तालावर क्रितिका थिरकताना दिसणार आहे. पेथालपूर मा पावो वाग्यो ने... असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'या चित्रपटात हाय एनर्जीचा डान्स पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण गुजरातमध्ये पार पडणार आहे. हे पारंपारिक लोकनृत्य असणार आहे. गुजरातमधील प्रसिद्ध लोकनृत्य गरबा यात पाहायला मिळणार आहे आणि या गरब्यावर थिरकताना दिसणार आहे क्रितिका. या गाण्याचे शूटिंग नुकतेच गुजरातमध्ये पार पडले. या गाण्याच्या चित्रीकरणाला अठरा तास लागले. या गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी क्रितिकाने एक आठवडा खूप सराव केला होता. क्रितिकाच्या डान्स व्हिडिओ खूप चांगला चित्रीत झाला असून निर्माते तिच्यावर खूप खूश झाले आहेत.'
क्रितिका कामराचा गरबा प्रेक्षकांना कितपत भावतो हे पाहावे लागेल आणि आगामी काळात क्रितिका पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.