लोकप्रिय अभिनत्री करतेय नोंदणी पद्धतीने लग्न, घटस्फोटित आहे होणारा नवरा; वयात ७ वर्षांचे अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:57 IST2026-02-20T17:52:35+5:302026-02-20T17:57:06+5:30

चाहते आता या जोडीला लग्नाच्या बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Kritika Kamra Gaurav Kapoor getting married on March 11, 2026 Reception Details Past Relationships | लोकप्रिय अभिनत्री करतेय नोंदणी पद्धतीने लग्न, घटस्फोटित आहे होणारा नवरा; वयात ७ वर्षांचे अंतर

लोकप्रिय अभिनत्री करतेय नोंदणी पद्धतीने लग्न, घटस्फोटित आहे होणारा नवरा; वयात ७ वर्षांचे अंतर

लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा ही लवकरच प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रेझेंटर व क्रिकेट कॉमेंटेटर गौरव कपूरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र, इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे भव्य दिव्य सोहळा करण्याऐवजी त्यांनी अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही ११ मार्च २०२६ रोजी गौरवच्या मुंबईतील घरी एका अत्यंत खासगी सोहळ्यात, कुटुंबियांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहेत.

कृतिका कामरा व गौरव कपूर लग्नानंतर एक रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन १२ मार्च रोजी होईल. या रिसेप्शनला चित्रपट इंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि सहकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


कृतिका आणि गौरव यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावर एक 'ब्रेकफास्ट डेट'चा फोटो शेअर करून आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी २०२६चे स्वागतही जैसलमेरमध्ये एकत्र केले होते. 

गौरव कपूरचे दुसरे लग्न

गौरव कपूरचे हे दुसरे लग्न असणार आहे. यापूर्वी त्याचे लग्न अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलसोबत झाले होते. परंतु २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, कृतिका कामराचे नाव यापूर्वी करण कुंद्रा आणि जॅकी भगनानी यांच्याशी जोडले गेले होते. पण तिचे हे पहिलेच लग्न आहे. आता कृतिका आणि गौरव या दोघांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून चाहते आता या जोडीला लग्नाच्या बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
 

Web Title : कृतिका कामरा करेंगी तलाकशुदा गौरव कपूर से कोर्ट मैरिज

Web Summary : अभिनेत्री कृतिका कामरा 11 मार्च 2026 को टीवी प्रस्तोता गौरव कपूर से शादी करेंगी। यह शादी एक निजी समारोह में होगी। गौरव का यह दूसरा विवाह है; उन्होंने पहले किरत भट्टल से शादी की थी। कृतिका ने दिसंबर 2025 में अपने रिश्ते की पुष्टि की।

Web Title : Kritika Kamra to wed divorced Gaurav Kapur in registry marriage

Web Summary : Actress Kritika Kamra will marry TV presenter Gaurav Kapur in a private registry ceremony on March 11, 2026, followed by a reception. This is Gaurav's second marriage; he was previously married to Kirat Bhattal. Kritika earlier confirmed their relationship in December 2025.