शर्वरी नाही तर धोनीच्या होणाऱ्या मेव्हणीची 'डॉन ३'मध्ये वर्णी, कोण आहे रणवीर सिंगची अभिनेत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:38 IST2025-04-24T09:31:16+5:302025-04-24T09:38:27+5:30

बॉलिवूडचा आगामी अ‍ॅक्शन सिनेमा 'डॉन 3' संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलं आहे.

Kriti Sanon To Join Ranveer Singh In Farhan Akhtar's Don 3 Filming Begins In October 2025 | शर्वरी नाही तर धोनीच्या होणाऱ्या मेव्हणीची 'डॉन ३'मध्ये वर्णी, कोण आहे रणवीर सिंगची अभिनेत्री ?

शर्वरी नाही तर धोनीच्या होणाऱ्या मेव्हणीची 'डॉन ३'मध्ये वर्णी, कोण आहे रणवीर सिंगची अभिनेत्री ?

Don 3: The Chase Ends: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची मुख्य भूमिका असलेल्या 'डॉन-३' चित्रपटाची मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा 'डॉन' हा चित्रपट प्रचंड चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 'डॉन'च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. अलिकडेच फरहान अख्तरने 'डॉन ३'ची घोषणा केली आणि त्यानंतर सगळेच फार उत्सुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. 

'डॉन-३' मध्ये अभिनेत्री कोण असणार यावरुन पडदा हटला आहे. 'डॉन 3'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीर सिंगने घेतल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. आता सिनेमातील अभिनेत्रीचेही नाव समोर आले आहे. 

'डॉन-३' मध्ये सर्वांत पहिल्यांदा रणवीर सिंगची अभिनेत्री म्हणून कियारा आडवाणी हिच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण, कियारा गर्भवती राहिल्यानं तिनं हा  'डॉन 3' चित्रपट सोडला. कियारानंतर मराठमोळ्या शर्वरी वाघच्या नावावर चर्चा सुरू होती. पण, आता  शर्वरी वाघ नाही तर क्रिकेटपटू धोनी याची होणारी मेव्हणी 'डॉन ३'मध्ये झळकणार आहे. 


पिंकव्हिलानुसार, अभिनेत्री क्रिती सनॉन हिची 'डॉन-३'मध्ये एन्ट्री केली आहे. फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटची क्रिएटिव्ह टीमचा 'डॉन ३' मध्ये एका अनुभवी अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार होता.  त्यांच्या मते, क्रिती सनॉन या प्रोजेक्टसाठी परिपूर्ण आहे. 'डॉन-३' या फ्रँचायझीच्या पुढील भागासाठी प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत.  क्रिती सनॉन हिच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर ती कबीर बहियाला डेट करतेय. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.  कबीर बहिया हा क्रिकेटर धोनी याचा मेहुणा आहे. कबीर हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे. 

Web Title: Kriti Sanon To Join Ranveer Singh In Farhan Akhtar's Don 3 Filming Begins In October 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.