रुमर्ड बॉयफ्रेंड कबीरसोबत म्युझिक एन्जॉय करताना दिसली क्रिती सनॉन, व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:36 IST2024-12-31T09:35:25+5:302024-12-31T09:36:23+5:30
Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पुन्हा एकदा तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत दिसली.

रुमर्ड बॉयफ्रेंड कबीरसोबत म्युझिक एन्जॉय करताना दिसली क्रिती सनॉन, व्हायरल होतोय व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. खरंतर अभिनेत्री बिझनेसमन कबीर बहिया(Kabir Bahiya)सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. नुकतेच ते एकत्र ख्रिसमस साजरा करतानाही दिसले. आता या रुमर्ड कपलचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरेतर, अलिकडेच राहत फतेह अली खानच्या कॉन्सर्टमध्ये क्रिती सनॉन आणि तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमन कबीर बहिया एकत्र दिसले होते. यावेळी अभिनेत्रीची बहीण नुपूर सनॉन आणि एमएस धोनीही या जोडप्यासोबत दिसले. क्रितीच्या बहिणीनेही या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
म्युझिक इव्हेंटमध्ये दिसली दोघांची छान केमिस्ट्री
आता या म्युझिक इव्हेंटचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एमएस धोनीसोबत क्रिती सनॉन आणि तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहिया देखील दिसला होता. गायकाने गायलेल्या 'क्या हुआ तेरा वादा' गाण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत. व्हिडीओमध्ये क्रिती पहिल्यांदा एमएस धोनीसोबत दिसत आहे. जी नंतर कबीरलाही तिच्याकडे बोलावतो. व्हिडिओमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
दिवाळीपासून सुरूये त्यांच्या अफेअरची चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती सनॉन सध्या कबीर बहियासोबत दुबईत आहे. जिथे हे कपल नवीन वर्ष एकत्र साजरे करणार आहे. याआधी दोघांनीही एकत्र नाताळ साजरा केला होता. त्यांच्या अफेअरच्या चर्चा दिवाळीपासून सुरू झाल्या होत्या. जेव्हा कबीर अभिनेत्रीच्या घरी पार्टीला गेला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या चित्रपटांमध्ये झळकली क्रिती
२०२४ हे वर्ष क्रितीसाठी खूप खास ठरले आहे. ती तीन चित्रपटांमध्ये दिसली होती. ज्यामध्ये शाहिद कपूरसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया', करीना कपूर खान आणि तब्बूसोबतचा 'क्रू' आणि काजोलसोबतचा 'दो पत्ती' या चित्रपटाचा समावेश आहे.