Kriti Sanon: प्रभास सोबत साखरपुडा करणार असल्याच्या अफवांवर अखेर सनॉनने सोडले मौन, म्हणाली-लोक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:25 IST2023-02-09T13:10:36+5:302023-02-09T13:25:34+5:30
बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत क्रिती साखरपुडा करणार असल्याची अफवा उडवल्या जात आहेत. अखेर यावर अभिनेत्रीने मौने सोडलं आहे.ल

Kriti Sanon: प्रभास सोबत साखरपुडा करणार असल्याच्या अफवांवर अखेर सनॉनने सोडले मौन, म्हणाली-लोक...
Kriti Sanon On Engagement Rumours With Prabhas: साऊथचा स्टार प्रभास सध्या त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. अभिनेत्याच्या पर्सनल आयुष्याबाबत नवीन बातम्या समोर येत आहेत. तो 'आदिपुरुष'ची को-स्टार क्रिती सनॉनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभास आणि क्रितीच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. 'बाहुबली' फेम अभिनेता क्रितीसोबत साखरपुडा करणार असल्याची अफवा उडवल्या जात आहेत. या अफवांचं प्रभासच्या टीमने स्पष्टपणे खंडन केल्यानंतर काही तासांतच शहजादा फेम अभिनेत्रीने पोस्ट केली आहे.
तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये, क्रितीने हॉलिवूडची आयकॉन ओप्रा विन्फ्रेची एक मोटिवेशनल रील शेअर केली आहे ज्यात "Letting Go" " या आर्टबद्दल बोलत आहे. ओपरा रीलमध्ये म्हणते, “लोक जिथं आहेत त्यांना तिथेच राहुद्या. आणि तुम्ही ते स्वीकारा किंवा नाही. असे न केल्याने, तुम्ही अशा परिस्थितीत अडकता ज्यामुळे तुमचा वेळ वाया जातो, त्यामुळे तुमची उर्जा देखील खर्च होते, व्हिडिओ शेअर करताना क्रितीने लिहिले की, "Word" स्टोरीच्या सोबत सॅल्यूटवाला एक इमोजी देखील पोस्ट केला आहे.
यापूर्वी आधी, प्रभासच्या टीमने प्रभास आणि क्रितीच्या एंगेजमेंटच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. अभिनेत्याच्या टीमने सांगितले होते की, दोघेही फक्त मित्र आहेत, टीमच्या निवेदनात म्हटले आहे की, 'प्रभास आणि क्रिती फक्त मित्र आहेत. त्यांच्या एंगेजमेंटची बातमी खरी नाही.
वर्क फ्रंट बाबत बोलायचे झाले तर, प्रभास लवकरच ओम राऊतचा 'आदिपुरुष', प्रशांत नीलचा 'सालार', नाग अश्विनचा 'प्रोजेक्ट के', मारुतीचा 'राजा डिलक्स' आणि संदीप रेड्डी वंगाचा 'स्पिरिट' या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, क्रिती सॅनॉनकडे कार्तिक आर्यन स्टारर 'शेहजादा', टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ', विशाल भारद्वाजचा 'चुरिया' आणि आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपट आहेत.