Adipurushच्या वादावर क्रिती सनॉननं सोडलं मौन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'मी फक्त...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:52 PM2023-06-20T13:52:48+5:302023-06-20T13:53:15+5:30

Adipurush : प्रभास आणि क्रिती सनॉनचा 'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान आता चित्रपटात जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सनॉनने प्रतिक्रिया दिली आहे.

Kriti Sanon breaks silence on Adipurush controversy, shares video and says, 'I just...' | Adipurushच्या वादावर क्रिती सनॉननं सोडलं मौन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'मी फक्त...'

Adipurushच्या वादावर क्रिती सनॉननं सोडलं मौन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'मी फक्त...'

googlenewsNext

प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा आदिपुरुष (Adipurush) रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि पात्रांवर आक्षेप घेतला आहे. यादरम्यान चित्रपटात जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सनॉनने प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. खरेतर क्रिती सनॉनने पोस्टच्या माध्यमातून पॉझिटिव्हिटी जाहीर केली आहे.

क्रिती सनॉनने इंस्टाग्रामवर आदिपुरुषचे मिळणारी प्रशंसा आणि हूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपटात प्रभास, सनी सिंग, सैफ अली खान आणि क्रिती सनॉनच्या सीन्सवर प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. व्हिडीओ शेअर करत क्रिती सनॉनने कॅप्शनमध्ये लिहिले की, चिअर्स आणि टाळ्यांवर फोकस करते आहे. जय सिया राम. अशारितीने क्रितीने सांगितले की, आता ती आदिपुरुष होत असलेल्या वादावर आणि निगेटिव्ह रिव्ह्यूवर लक्ष देणार नाही.

निर्मात्यांनी नेपाळला पाठवला माफीनामा
क्रिती सनॉन आणि प्रभास स्टारर चित्रपटातील संवादांला खूप विरोध होत आहे. नेपाळमध्येही केवळ 'आदिपुरुष'च नव्हे तर सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. कारण 'आदिपुरुष'मध्ये सीतेचे वर्णन भारताची कन्या आहे. त्यानंतर निर्मात्यांनी माफीनामा लिहून नेपाळ चित्रपट विकास मंडळ आणि काठमांडूचे महापौर बलेन शाह यांची माफी मागितली आहे. माफीनाम्यात, निर्मात्यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल नेपाळ चित्रपट विकास मंडळाची माफी मागितली आहे आणि चित्रपट केवळ एक कला म्हणून पाहण्याचे आवाहनही केले आहे. यासोबतच निर्मात्यांनी 'सीता'ला 'भारताची कन्या' आणि रामाच्या पात्राचे वर्णन करणाऱ्या संवादाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.


एकीकडे विरोध तर दुसरीकडे सिनेमा सुस्साट...
आदिपुरूष चित्रपटाला वाढलेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते आहे. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. वादानंतर निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरेतर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीदेखील केली आहे.

Web Title: Kriti Sanon breaks silence on Adipurush controversy, shares video and says, 'I just...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.