Video: बॉयफ्रेंडसोबत उभी होती क्रिती सनॉन, पापाराझी काढत होते फोटो, अभिनेत्री भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:02 IST2026-01-14T17:02:43+5:302026-01-14T17:02:55+5:30
बॉयफ्रेंडसोबत पापाराझींनी टिपताच भडकली क्रिती सनॉन; व्हिडीओ व्हायरल, चुटकी वाजवत केला इशारा

Video: बॉयफ्रेंडसोबत उभी होती क्रिती सनॉन, पापाराझी काढत होते फोटो, अभिनेत्री भडकली
अभिनेत्री क्रिती सनॉनची बहीण नुपूर सनॉन हिचं नुकतंच लग्न झाल आहे. बॉयफ्रेंड गायक स्टेबिन बेन याच्याशी तिनं मोठ्या थाटामाटात उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नाला क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड कबीर बाहिया यानेदेखील हजेरी लावली होती. या लग्नानंतर उदयपूरहून परतताना विमानतळावर पापाराझींच्या एका कृतीमुळे अभिनेत्री चांगलीच भडकल्याचं पाहायला मिळालं.
क्रिती ही तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत असताना पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे कृती प्रचंड संतापली. तिनं हाताने इशारा करत आणि बोटं रोखून फोटोग्राफर्सना व्हिडीओ काढणे थांबवण्यास सांगतिलं. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कॅमेरे पाहून क्रिती संतापलेली असताना कबीर बहिया याने मात्र वेगळीच भूमिका घेतली. मीडियाचे कॅमेरे समोर असल्याचे पाहताच कबीरने तिला तिथेच सोडून पुढे निघून जाणे पसंत केले.
क्रिती आणि लंडनस्थित उद्योगपती कबीर बहिया यांच्या डेटिंगच्या चर्चा २०२४ पासून सुरू आहेत. ग्रीसमध्ये कृतीचा वाढदिवस साजरा करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, अद्याप दोघांनीही या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही.
कोण आहे कबीर बहिया?
कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे. कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्याही जवळचा आहे. तो धोनीचा मेहुणा आहे.