लेकामुळे रस्त्यावर आले होते यश जोहर? राणी मुखर्जीने केली करणची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:03 IST2023-11-27T14:02:35+5:302023-11-27T14:03:57+5:30

हा एपिसोड चाहत्यांसाठी तर पर्वणीच असणार आहे.

Koffee with Karan season 8 Kajol and rani mukherjee s entry in new episode where actresses made fun of director | लेकामुळे रस्त्यावर आले होते यश जोहर? राणी मुखर्जीने केली करणची पोलखोल

लेकामुळे रस्त्यावर आले होते यश जोहर? राणी मुखर्जीने केली करणची पोलखोल

करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विद करण' च्या आगामी एपिसोडमध्ये मुखर्जी बहिणी येणार आहेत. काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) एकत्र येत शोची शोभा वाढवणार आहेत. प्रोमोमध्ये राणी करणचीच पोलखोल करताना दिसत आहे.  हा एपिसोड चाहत्यांसाठी तर पर्वणीच असणार आहे.

'कॉफी विद करण' 8 मध्ये बीटाऊमधील लोकप्रिय बहिणी येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होतीच. 'कुछ कुछ होता है' फेम टीना म्हणजेच राणी मुखर्जी आणि अंजली म्हणजेच काजोल शोमध्ये गप्पा मारणार असून धमाल येणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच राणी करण जोहरला म्हणते,'मला तुला एक्सपोज करायचं आहे'. हे ऐकून करणही शॉक होतो. तेव्हा काजोलही चेष्टा करत म्हणते, 'मला आतापासूनच मजा येतीये'.

पुढे करण जोहर त्याच्या वडिलांचा किस्सा सांगताना म्हणतो,'मला आठवतंय जेव्हा आपण कुछ कुछ होता है चं चित्रीकरण करत होतो आणि माझे वडील महबूब स्टुडिओ बाहेर रस्त्यावर उभे राहून बोलत होते. संजय दत्तने त्यांना विचारलं, 'यशजी तुम्ही इथे काय करत आहात?' तेव्हा ते म्हणाले,'माझ्या मुलाने सेट लावला आहे आणि मी रस्त्यालर आलोय.'

प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की राणीने करणवर अनेक आरोप लावले आहेत. अन्न हिसकावणे आणि मला मारणे असे आरोप तिने केले आहेत. काजोलनेही याला 'अब्यूज' असं म्हटलं आहे. शेवटी सगळेच ही गोष्ट मजेत घेताना दिसतात. या प्रोमोमुळे हा एपिसोड खूपच खास असणार आहे हे दिसून येतंय. चाहते एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Koffee with Karan season 8 Kajol and rani mukherjee s entry in new episode where actresses made fun of director