करण जोहर आणि करिना कपूरमध्ये झालं होतं जोरदार भांडण, २ वर्ष एकमेकांशी होता अबोला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:51 IST2023-11-09T09:50:02+5:302023-11-09T10:51:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि दिग्दर्शक करण जोहर आज भलेही चांगले मित्र आहेत, पण काही वर्षांपूर्वी ते दोघे एकमेकांशी अजिबात बोलतही नव्हते.

koffee with karan 8 karan johar talks about his fight with kareena kapoor and kajol reveals what happened | करण जोहर आणि करिना कपूरमध्ये झालं होतं जोरदार भांडण, २ वर्ष एकमेकांशी होता अबोला अन् ...

करण जोहर आणि करिना कपूरमध्ये झालं होतं जोरदार भांडण, २ वर्ष एकमेकांशी होता अबोला अन् ...

करण जोहर आणि करिना कपूर खान यांची मैत्री तर जगजाहीर आहे. अनेकदा दोघे पार्टी करताना किंवा गेट टुगेदरमध्ये एकत्र दिसतात. करण आणि करिनामध्ये खूप चांगलं बाँडिंग आहे. करणने करिनाच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. पण दोघांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा दोघांनी एकमेकांचे तोंडही पाहिचं नव्हतं. करण आणि करिना जवळपास दीड वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. 

सारा अली खान आणि अनन्या पांडे कॉफी विथ करण 8 च्या एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासमोर करण जोहरने खुसाला केला की, त्यांच्या जवळच्या मैत्रींसोबत त्याचे भांडण झाले होते. 2003 मध्ये त्याचे करिनासोबत भांडण झाले होते.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार करण जोहरने सांगितलं की करिना कपूरसोबत भांडण झाल्यावर तो दीडवर्ष बोलत नव्हता. यामागचं कारण होत त्याचा 'कल हो ना हो' सिनेमा. करणच्या म्हणण्यानुसार, दोघांचं बोलणं निर्माते आणि त्याचे वडील यश जोहर यांना कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यावर पुन्हा सुरु झाले होते. करणने सांगितले की त्याला करिना कपूरने फोन केला होता आणि म्हणाली मी काय बोलू हेच मला सुचतं नाहीय. करणने तिला म्हणाला की तुला काहीच बोलायची गरज नाहीय. मला माहिती आहे तू माझ्यासोबत आहेस ते. वडिलांचं निधन झाले तेव्हा ती बँकॉकमध्ये होती. पण परत येताच ती थेट माझ्या घरी आली. रात्रभर आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या होत्या. 

नेमका काय होता वाद?
करणने करिनाला 'कल हो ना हो' चित्रपटातील मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र करिनाने या चित्रपटासाठी शाहरुख खानला मिळणाऱ्या मानधना इतक्याच पैशांची मागणी केली. जी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. मी तिला सॉरी म्हणालो आणि घरी आलो. घरी गेल्यावर तिला पुन्हा एकदा फोन केला होता पण, तिने फोन उचलला नाही. त्यानंतर चित्रपटात प्रीती झिंटाला घेण्यात आले. यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. 

Web Title: koffee with karan 8 karan johar talks about his fight with kareena kapoor and kajol reveals what happened