जाणून घ्या लेखक- दिग्दर्शक सुमीत अरोराचा 'व्हाईट शर्ट'मध्ये दडलंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:02 IST2017-02-21T10:32:20+5:302017-02-21T16:02:20+5:30
सुजॉय घोषचा 'अहल्या',जयदिप सरकारचा 'नयनताराज नेकलेस',अधिराज बोसचा 'इंटिरिअर कॅफे',नीरज पांडेचा 'आऊच',ज्योथी कपूरदासचा 'चटनी' जानू बरूआचा 'दॅट गस्टी मॉर्निंग' आणि ...

जाणून घ्या लेखक- दिग्दर्शक सुमीत अरोराचा 'व्हाईट शर्ट'मध्ये दडलंय काय?
स जॉय घोषचा 'अहल्या',जयदिप सरकारचा 'नयनताराज नेकलेस',अधिराज बोसचा 'इंटिरिअर कॅफे',नीरज पांडेचा 'आऊच',ज्योथी कपूरदासचा 'चटनी' जानू बरूआचा 'दॅट गस्टी मॉर्निंग' आणि विक्रम भट्टचा 'लेटस प्ले'.या शॉर्ट फिल्म नंतर आता लेखक- दिग्दर्शक सुमित अरोराची 'व्हाईट शर्ट' नावाची शॉर्ट फिल्म प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. व्हाईट शर्ट ही जोडप्यांसाठी ब्रेक-अपनंतर एकमेकांपासून दूर राहणे किती अवघड असते यावरही शॉर्ट फिल्म भाष्य करते. 20 मिनीटांच्या या फिल्ममध्ये या दोघांमध्ये व्हाईट शर्ट हा दोघांमध्ये एक दुवा बनत एकमेकांपासून दुरावण्यास रोखत असतो अशी कथा मांडण्यात आली आहे.याविषयी दिग्दर्शक सुमीत अरोरा सांगतात की, ही मानवी भावनांचा वेध घेणारी शॉर्ट फिल्म आहे.शॉर्ट फिल्ममुळे आपली क्रिएटीव्हीटी आपल्या कळत असल्यामुळे मी हा विषय एक भव्य सिनेमा नाहीतर शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेतला.माझा हा सिनेमाही रसिकांना आवडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.दिग्दर्शक सुमीत अरोरा दशकापासून मालिकाचे लेखन करत असून दिल मिल गये,छुना है आसमाँ आणि साडा हक्क या सारख्या कलाकृती आपल्या लेखनशौलीने गाजवल्या आहेत.सिनेमांप्रमाणेच भारतात शॉर्ट फिल्मस हे माध्यम झपाट्याने विकसित होत आहेत. अनेक दिग्दर्शकांचा शॉर्ट फिल्म बनवण्याकडे कल वाढत असल्यामुळे अनेक प्रोडक्शन हाऊसही शॉर्ट फिल्म्स बनवणा-या दिग्दर्शकांना मदतीचा हात देत आहे.तसेच या शॉर्ट फिल्म्स तरूणाईलाही आकर्षित करण्यात करण्यातही यशस्वी ठरत आहे. त्यामुळे व्हाईट शर्ट ही शॉर्ट फिल्म्स रसिकांच्या कितपत पसंतीस उतरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.