अतरंगी गेटअपमध्ये दडलाय अभिनेत्रीचा चेहरा,ओळखण्यासाठी लावले जातायेत तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 11:00 IST2021-11-16T10:59:34+5:302021-11-16T11:00:57+5:30
पहिल्यांदाच तिने असा पब्लिसिटी मिळवण्यासाठी स्टंट केला आहे असे नाही तर याआधीही तिने अशा प्रकारे स्टंट करत पब्लिसिटी मिळवली आहे.

अतरंगी गेटअपमध्ये दडलाय अभिनेत्रीचा चेहरा,ओळखण्यासाठी लावले जातायेत तर्कवितर्क
अनेकदा सेलिब्रेटींना त्याच्या नावाचीच चर्चा व्हावी किंवा मग सतत चर्चेत राहणे खूप आवडते. त्यामुळे विविध गोष्टी करत फोटोशूट करण्याचा ट्रेंडही प्रचंड प्रमाणात वाढला आहे.सध्या सोशळ मीडियाचा जमाना आहे.सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी आपले फोटो व्हिडीओ शेअर करत वाहवा मिळवताना दिसतात.अनेकदा अतरंगी फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे अनेकदा पाहायला मिळतात. सध्या अशाच एका सेलिब्रेटींचा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा फोटो आहे अभिनेत्री अदा शर्माचा. सोशल मीडियावर अदा शर्मा प्रचंड सक्रीय असते. तिचे असेच फोटो व्हिडीओ ती शेरअ करताना दिसते. सध्या तिचा हा फोटो पाहून अनेकांनी तिला ओळखले तर अनेकांना ओळखण्यास कठीण जात आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. पहिल्यांदाच तिने असा पब्लिसिटी मिळवण्यासाठी स्टंट केला आहे असे नाही तर याआधीही तिने अशा प्रकारे स्टंट करत पब्लिसिटी मिळवली आहे.
अदा गेल्या काही दिवसांपासून कोणत्या सिनेमात झळकत नसली तरी, सोशल मीडियावर मात्र तिचे दर्शन चाहत्यांना घडत असते. अदाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात. 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ या सिनेमामधून अदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानंतर तिने मागे वळून पाहिल नाही. ‘हंसी तो फसी’, ’कमांडो 3’ सारखेहिट सिनेमातल्या अदाच्या भूमिकांनाही प्रचंड पसंती मिळाली होती. बॉलिवूडप्रमाणे ती दाक्षिणात्य सिनेमातही झळकली आहे. बॉलिवूडप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.