​जाणून घ्या, दीप्ति नवलबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 11:50 IST2017-02-03T06:18:39+5:302017-02-03T11:50:01+5:30

चेह-याने सतत हसतमुख असणारी अभिनेत्री दीप्ति नवल हिचा आज (३ फेबु्रवारी) वाढदिवस. दीप्तिच्या अभिनयाची जितकी प्रशंसा करावी, तितकी कमी ...

Know, things you do not know about Brightness ... | ​जाणून घ्या, दीप्ति नवलबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी...

​जाणून घ्या, दीप्ति नवलबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी...

ह-याने सतत हसतमुख असणारी अभिनेत्री दीप्ति नवल हिचा आज (३ फेबु्रवारी) वाढदिवस. दीप्तिच्या अभिनयाची जितकी प्रशंसा करावी, तितकी कमी आहे. ती केवळ एक परिपक्व अभिनेत्रीच नाही तर एक अतिशय संवेदनशील लेखिका, चित्रकार आणि फोटोग्राफर सुद्धा आहे. दीप्तिबद्दल अशाच काही अनोख्या गोष्टी...



-३ फेबु्रवारी १९५७ रोजी पंजाबच्या अमृतसर येथे दीप्तिचा जन्म झाला. वडिलांना न्यूयॉर्कमध्ये नोकरी मिळाल्यावर ती कुटुंबासोबत अमेरिकेला गेली. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीतून तिने शिक्षण घेतले.

- कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीप्तिने न्यूयॉर्कमध्येच एका रेडिओ स्टेशनवर काम सुरु केले. यावर हिंदी कार्यक्रमही यायचे. यानंतर तिने अ‍ॅक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यापश्चात दीप्तिला भारतात येण्याची संधी मिळाली आणि याच काळात दीप्तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.



श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटापासून दीप्तिने बॉलिवूड डेब्यू केले. खरे तर अभिनेत्री होणे हे दीप्तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत दीप्तिने याबद्दल एक अवाक्षरही काढले नव्हते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीप्तिने तिच्या आई-वडिलांकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण दीप्तिच्या पित्याची इच्छा तिने एक मोठी चित्रकार बनावी, अशी होती. वडिलांच्या इच्छेखातर दीप्तिने पेन्टिंग आणि अभिनय या दोन्ही कला जोपासण्याचा निर्णय घेतला. 

खरे तर दीप्ति अभिनय क्षेत्रात अगदी नवखी होती. ‘जुनून’मध्ये ती केवळ दोन तीन दृश्यांत दिसली.  त्यामुळे तिची फार दखल घेतल्या गेली नाही. पण १९७९ मध्ये ‘एक बार फिर’मध्ये दीप्ति दिसली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 

दीप्तिने आपल्या करिअरमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘चश्मे बहादूर’,‘अनकही’,‘मैं जिंदा हू’,‘कमल’ असे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. केवळ अभिनयच नाही तर लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही तिने हात आजमावला. ‘थोडा सा आसमान’ या टीव्ही मालिकेची पटकथा दीप्तिने लिहिली होती. शिवाय या मालिकेची दिग्दर्शकही ती होती.



चित्रकार या नात्याने अनेक मोठ्या चित्रप्रदर्शनात तिच्या पेन्टिंग झळकल्या. कवयित्री म्हणून १९८३ मध्ये तिचा ‘लम्हा लम्हा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. २००४ मध्ये ‘ब्लॅक विंड अ‍ॅण्ड अदर पोयम्स’ हा तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याशिवाय २०११ मध्ये एक लघूकथा संग्रहही आला.



१९८४ मध्ये प्रकाश झा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हा त्यांची भेट दीप्ति नवलशी झाली. यानंतर प्रकाश झा यांनी दीप्तिला घेऊन ‘दामुल’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. येथून दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दीप्ति व  प्रकाश झा विवाहबंधनात अडकले. हे लग्न १७ वर्षे चालले. या दोघांना दोन मुलेही आहेत. मुलगा प्रियरंजन झा आणि मुलगी दिशा झा. प्रकाश व दीप्तिमध्ये लग्नानंतर काहीच वर्षांत खटके उडायला सुरुवात झाली. अखेर २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अर्थात घटस्फोटानंतरही दीप्ति व प्रकाश यांच्यात चांगले संबंध आहेत.



घटस्फोटानंतर दीप्ति प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित यांच्या जवळ आली. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण त्याचपूर्वी विनोद यांचे निधन झाले. सध्या दीप्ति मानसिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आजाराबद्दल जनजागृतीचे काम करते. शिवाय तिचा दिवंगत मंगेतर विनोद पंडित याच्या स्मरणार्थ स्थापित केलेला‘विनोद पंडित चॅरिटेबल ट्रस्ट’ सुद्धा चालवते.

Web Title: Know, things you do not know about Brightness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.