जाणून घ्या, बॉलिवूड स्टार्सची काही सीक्रेट अफेअर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 15:25 IST2017-02-14T09:55:54+5:302017-02-14T15:25:54+5:30

बॉलिवूड स्टार्सचे सीक्रेट अफेअर्स हा नेहमीच बॉलिवूडप्रेमींच्या ‘जिव्हाळ्या’चा विषय राहिला आहे. यापैकी काही सीक्रेट अफेअर्स तुम्हाला कदाचित ठाऊकही असतील. ...

Know, some Bollywood stars have some secret rights ... | जाणून घ्या, बॉलिवूड स्टार्सची काही सीक्रेट अफेअर्स...

जाणून घ्या, बॉलिवूड स्टार्सची काही सीक्रेट अफेअर्स...

ong>बॉलिवूड स्टार्सचे सीक्रेट अफेअर्स हा नेहमीच बॉलिवूडप्रेमींच्या ‘जिव्हाळ्या’चा विषय राहिला आहे. यापैकी काही सीक्रेट अफेअर्स तुम्हाला कदाचित ठाऊकही असतील. पण बॉलिवूडमधील अनेक सीक्रेट अफेअर्स आहेत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशाच काही बॉलिवूड स्टार्सच्या सीक्रेट अफेअर्सवर एक नजर...

राज कपूर - नर्गिस



राज कुमार आणि अभिनेत्री नर्गिस यांची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. खुद्द ऋषी कपूर यांनी आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बायोग्राफीत या लव्हस्टोरीचा खुलासा केलाय. राज कपूर विवाहित असताना नर्गिस त्यांच्या प्रेमात पडली. राज कपूरही नर्गिसच्या प्रेमात वेडे झाले होते. ते ना नर्गिसला सोडू इच्छित होते, ना आपल्या पत्नीला. नर्गिला हे कळले ती तेव्हा पूर्णत: कोलमडून पडली. आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळू लागलेत. पण याच काळात तिच्या आयुष्यात सुनील दत्त यांची एन्ट्री झाली.

सुरैय्या- देवआनंद



सुरैय्या आणि देवआनंद यांची लव्ह स्टोरीही अशीच एक सीक्रेट लव्हस्टोरी. सुरैया करिअरच्या शिखरावर होती तर देवआंनद बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होते. पण तरिही हे प्रेम फुलले. पण सुरैय्याची आजी या प्रेमकहानीतील व्हिलन ठरली, असे मानले जाते. देवआनंद सुरैय्यासाठी सगळ्या गोष्टींवर पाणी फेरण्यास तयार होते. पण सुरैय्याने पाऊल मागे घेतले. सुरैय्याचा हा निर्णय देवआनंद यांच्यासाठी निश्चितपणे धक्कादायक होता.

अमिताभ- रेखा



अमिताभ बच्चन व रेखा यांची लव्हस्टोरी म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात अपयशी लव्हस्टोरी. रेखा व अमिताभ ही जोडी अनेक चित्रपटात दिसली. आजही लोक या जोडीला एकत्र पाहण्यास आतूर आहेत. अर्थात हा योग येणे शक्य नाही(?). ‘दो अनजाने’च्या सेटवर अमिताभ व रेखा यांच्यात प्रेमाचा ‘सिलसिला’ सुरु झाला. पण अमिताभ यांनी कधीच हे प्रेम जाहिर केले नाही. रेखा मात्र या नात्याला नाव देण्यास अगदी तयार होती. काही वर्षांनंतर अमिताभ यांनी अभिनेत्री जया यांच्यासोबत लग्न करून रेखासोबतच्या ‘सीके्रेट’ नात्याला पूर्णविराम दिला.
 
शत्रुघ्न सिन्हा - रिना रॉय



शत्रुघ्न सिन्हा व रिना रॉय यांच्या अफेअरला सीक्रेट अफेअर म्हणता येणार नाही. पण शत्रुघ्न व रिनाचे नाते का तुटले, या अर्थाने याला सीक्रेट अफेअर म्हणता येईल. त्याकाळात रिनाचे करिअर अगदी शिखरावर होते. याच काळात शत्रुघ्न सिन्हासोबत तिचे अफेअर सुरु झाले. याचदरम्यान रिना खासगी कामासाठी लंडनला गेली आणि इकडे शत्रुघ्न यांनी माजी मिस यंग इंडिया पूनम चंडीरामणि हिच्यासोबत लग्न केले. रिना या लग्नाची बातमी ऐकून जाम भडकली. पण कदाचित शत्रुघ्न यांनी रिनाला समजावले. लग्नानंतर अनेक वर्षे शत्रुघ्न रिनाला भेटत राहिले. एका मुलाखतीत शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांनी या नात्याचा खुलासा केला होता. शत्रुघ्न व रिना यांच्याबद्दल मला सगळे काही माहित होते, असे पूनम यांनी सांगितले होते.

मिथुन - श्रीदेवी



मिथुन आणि श्रीदेवी यांनी गुपचूप विवाह केल्याचेही बोलले गेले.  मिथून व श्रीदेवी यांचे परस्परांवर प्रेम होते. अर्थात ही गोष्ट त्यांनी कधीही कबुल केली नाही. ‘जाग उठा इन्सान’च्या सेटवर मिथून आणि श्रीदेवी जवळ आलेत.  दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचेही मानले जाते. पण मिथून यांनी हे नाते जगापासून लपवून ठेवले. मिथून यांची पत्नी योगिता हिच्या कानावर या अफेअरची चर्चा गेल्यावर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर मिथून सगळे सोडून आपल्या पत्नीकडे परतला. यानंतर काहीच दिवसांत श्रीदेवीने अचानक बोनी कपूरशी लग्न केले.

अक्षय कुमार - रवीना टंडन



नव्वदच्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडनची प्रेमकथा बहरली. त्याकाळात रवीना एक आघाडीची अभिनेत्री होती. ‘मोहरा’च्या सेटवर अक्षय व रवीना जवळ आलेत. रवीना या नात्याबद्दल प्रचंड गंभीर होती. पण अक्षयचे प्रत्येक मुलीवर पे्रम जडायचे. अक्षयच्या या स्वभावामुळे रवीनाने अक्षयला सोडले आणि हे अफेअर कायमचे सीक्रेट अफेअरच्या रांगेत जावून बसले.
 
 अक्षय कुमार- शिल्पा शेट्टी



अक्षयचे नाव केवळ रवीनासोबतच जुळले नाही तर शिल्पा शेट्टीसोबतचा त्याचा एक लव्ह एपिसोडही चांगलाच गाजला. रवीना दूर गेल्यानंतर अक्षय शिल्पा शेट्टीच्या जवळ आला. पण इथेही अक्षयचा स्वभाव आडवा आला. ज्यावेळी अक्षय शिल्पासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याचवेळी तो टिष्ट्वंकल खन्ना हिच्या प्रेमातही बुडाला होता. अखेर शिल्पाने माघार घेत, टिष्ट्वंकलसाठी मार्ग मोकळा करून दिला.

करिना कपूर -हृतिक रोशन



करिना कपूर आणि हृतिक रोशन यांचे लव्ह अफेअर असेच एक सीक्रेट अफेअर. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात हृतिकची अभिनेत्री करिना कपूर होती. अर्थात आधी. अचानक करिनाने हा चित्रपट सोडला आणि तिच्याजागी अमिषा पटेल हिची वर्णी लागली. याच चित्रपटाच्या सेटवर हृतिक व करिना यांच्यातील जवळीक वाढल्याचे बोलले जाते. कदाचित याचमुळे की काय, आई बबिताच्या सांगण्यावरून करिनाने हा चित्रपट सोडला आणि इथेच करिना व हृतिकच्या लव्ह स्टोरीलाही ब्रेक लागला.

आमिर खान - जेसिका हाइन्स



बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याची दोन लग्न झाली आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच.  रिना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी. रिनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिरने किरण राव हिच्याशी दुसरा विवाह केला. याशिवाय आमिर खानचे एक सीक्रेट अफेअर्स होते. होय, तेही एका विदेशी पत्रकार तरूणीशी.  जेसिका हाइन्स असे तिचे नाव. ‘गुलाम’ या चित्रपटाच्या सेटवर आमिर व जेसिकाची ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री फुलली आणि लवकरच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. लिव्हइनदरम्यान जेसिका प्रेग्नंट झाल्याचे बोलले जाते. पण आमिरने तिच्यावर अबॉर्शनसाठी दबाव टाकला. पण जेसिकाने याला स्पष्ट शब्दात नकार दिला व कायमची लंडनला निघून गेली. सिंगल मदर बनून तिने या बाळाचा सांभाळ केला. आमिरने जाहिरपणे कधीही हे नाते कबुल केले नाही. या मुलाबद्दल तो कधीही बोलला नाही.

ऐश्वर्या राय व सलमान खान



ऐश्वर्या राय व सलमानची लव्हस्टोरी माहित नसेल, असा एकही जण नसेल. पण या लव्हस्टोरीचा अंत असा काही वाईट झाला की, आज दोघेही एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. ‘हम दिल दे चुके’च्या सेटवर सलमान व ऐश्वर्या जवळ आले. पण हा त्यांचा एकत्र शेवटचा चित्रपट ठरला. सलमानचा ओव्हर इमोशनल आणि पसेसिव्ह स्वभाव या नात्याच्या आड आला. सलमानने अनेकदा ऐश्वर्याला मारहाण केल्याचेही बोलले जाते. सलमानच्या या स्वभावाला कंटाळून ऐश्वर्याने त्याच्यासोबतचे नाते कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Know, some Bollywood stars have some secret rights ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.