महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 10:14 IST2019-04-17T10:12:58+5:302019-04-17T10:14:31+5:30

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे.

kkangana ranauts sister rangoli makes a shocking evelation about mahesh bhatt | महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

ठळक मुद्देमहेश भट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती, या रंगोलीच्या खुलाशाने तूर्तास खळबळ माजली आहे. आता यावर महेश भट काय उत्तर देतात, ते बघूच.

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपासून कंगना थेटपणे आलियाला लक्ष्य करतेय. आधी तिने आलियाला स्वार्थी म्हटले. मग ती करण जोहरच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याचे म्हणाली. इतके कमी की काय म्हणून आलियाच्या ‘गली बॉय’वर प्रतिक्रिया देताना, सुमार कामाचे कौतुक थांबवा, अशा शब्दांत कंगनाने आलियावर निशाणा साधला. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे. याला कारण ठरले आहे, सोनी राजदान यांचे एक  ट्वीट.


महेश भट यांनी कंगनाला ब्रेक दिला. पण हीच कंगना सतत महेश भट यांच्या पत्नी व मुलीवर टीका करतेय. आता मी काय बोलू? यामागचा अजेंडा काय? ’,असे  ट्वीटसोनी राजदान यांनी केले. सोनी राजदान यांचे हे  ट्वीट कंगनाची बहीण रंगोलीला पचेल तर नवल. त्यामुळेच ती बिथरली आणि महेश भट यांच्याबद्दल तिने एक खळबळजनक खुलासा केला.


 

सोनी राजदान यांच्या ट्वीटला उत्तर देताना रंगोलीने लिहिले की, ‘प्रिय सोनीजी, महेश भट यांनी कंगनाला बे्रक दिलेला नाही तर अनुराग बासूने दिला. महेश भट यांनी त्या चित्रपटात क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केले होते. ‘धोखा’ यांच्या चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यामुळे महेश भट संतापले होते. त्यांनी कंगनाला नाही नाही ते सुनावले होते. ‘लम्हे’च्या प्रिव्यूदरम्यान महेश भट यांनी १९ वर्षांच्या कंगनाला चप्पल फेकून मारली होती. त्यांनी कंगनालाच तिचा चित्रपट पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती.’
महेश भट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती, या रंगोलीच्या खुलाशाने तूर्तास खळबळ माजली आहे. आता यावर महेश भट काय उत्तर देतात, ते बघूच. शिवाय हा वाद कुठल्या वळणावर जातो, तेही बघू.

Web Title: kkangana ranauts sister rangoli makes a shocking evelation about mahesh bhatt