Salman Khan: ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? कपिल शर्माच्या प्रश्नावर सलमानचं हटके उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:47 IST2023-04-14T15:40:09+5:302023-04-14T15:47:33+5:30
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan, Salman Khan : ‘किसी का भाई किसी की जान’च्या प्रमोशनसाठी सलमान ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. मग काय, कपिलने धम्माल प्रश्न विचारलेत आणि भाईजानने धम्माल उत्तरं दिलीत. बोलता बोलता भाईजानने आपल्या सर्व एक्स गर्लफ्रेन्डला जोरदार टोमणाही मारला...

Salman Khan: ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? कपिल शर्माच्या प्रश्नावर सलमानचं हटके उत्तर
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan ) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या सलमान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharm Show) पोहोचला. मग काय, कपिलने धम्माल प्रश्न विचारलेत आणि भाईजानने धम्माल उत्तरं दिलीत. बोलता बोलता भाईजानने आपल्या सर्व एक्स गर्लफ्रेन्डला जोरदार टोमणाही मारला.
होय, शोमध्ये कपिल शर्माने सलमानला मजेशीर प्रश्न केलेत. सगळे तुला भाईजान म्हणतात. पण ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? असा प्रश्न कपिलने केला. यावर सलमानने हटके उत्तर दिलं.
सलमान म्हणाला...
“मी म्हणेल की, आयुष्यात ‘जान’ म्हणण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. ‘जान’पासून स्टार्ट होतं आणि मग त्या तुमची ‘जान’ घेतात. तुझ्यासोबत मी खूप आनंदी आहे... मी शब्दांत सांगू शकत नाही...असं म्हणत म्हणत थोडा वेळ जातो आणि त्यानंतर त्या आय लव्ह यू म्हणतात... या ‘आय लव्ह यू’नंतर मुलगा फसला हे लक्षात आलं की, बास्स तुमचं आयुष्य बर्बाद.... माझ्या मते, ‘जान’ हा अपूर्ण शब्द आहे. जान ले लूंगी तेरी, उसके बाद किसी और को जान बनाऊंगी और उसके बाद उसकी भी जान ले लूंगी... कदाचित हे पूर्ण वाक्य आहे..., असं सलमान म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून कपिल शर्माला हसू आवरलं नाही.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फरहाद सामजीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.