"तू आमच्या आयुष्यातील VVVIP पण...", आमिरने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करताच किरण रावची पहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:23 IST2025-03-16T13:23:24+5:302025-03-16T13:23:48+5:30
आमिरने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करताच किरण रावची पहिली पोस्ट, लेकासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली...

"तू आमच्या आयुष्यातील VVVIP पण...", आमिरने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करताच किरण रावची पहिली पोस्ट
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता आमिर खान त्याच्या लव्ह लाइफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच आमिरने ६०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचं आमिरने सांगितलं. आमिरने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केल्यानंतर त्याची एक्स पत्नी किरण रावने पोस्ट शेअर केली आहे.
किरण रावने तिच्या सोशल मीडियावर आमिरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांचा लेकही दिसत आहे. किरणने आमिरच्या बर्थडेनिमित्त ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला तिने दिलेल्या कॅप्शनने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. "आमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिठी, हास्यासाठी आणि नेहमीच आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल थँक्यू. आम्ही तुझ्यावर अजूनही प्रेम करतो", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आमिरने पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्यानंतर किरण रावशी संसार थाटला होता. २००५मध्ये आमिर आणि किरणने लग्न केलं होतं. १६ वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना आझाद हा मुलगा आहे. आता दुसऱ्या घटस्फोटानंतर आमिर गौरीला डेट करत आहे.