किरण रावला आवडत नाही 'एक्स वाईफ' हा टॅग, आमिर खानबद्दल संतापून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:30 AM2024-02-12T11:30:54+5:302024-02-12T11:32:04+5:30

सतत आमिरची एक्स वाईफ म्हटलं जात असल्याने आता तिने त्याविरोधात आवाज उठवला आहे.

kiran rao dosent like ex wife tag says i have my own identity also talks about amir khan | किरण रावला आवडत नाही 'एक्स वाईफ' हा टॅग, आमिर खानबद्दल संतापून म्हणाली...

किरण रावला आवडत नाही 'एक्स वाईफ' हा टॅग, आमिर खानबद्दल संतापून म्हणाली...

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. नुकतंच त्याच्या मुलीचं आयरा खानचं लग्न झालं. तर आता त्याची एक्स वाईफ किरण रावच्या (Kiran Rao) 'लापता लेडीज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. किरण रावही आयरा खानच्या लग्नात अगदी हिरीरीने सहभागी झाली होती. मात्र तिला सतत आमिरची एक्स वाईफ म्हटलं जात असल्याने आता तिने त्याविरोधात आवाज उठवला आहे. माझी स्वत:चीही वेगळी ओळख आहे असं ती म्हणाली.

किरण राव स्वत: दिग्दर्शिका, निर्माती आहे. आमिर खानच्याच सुपरहिट 'लगान'सिनेमातून तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. किरण राव फारशी माध्यमांमध्ये अॅक्टिव्ह नसते. मात्र तिने नुकतीच दिलेली मुलाखत चर्चेत आहे. जेव्हा लोक तुम्हाला आमिरची एक्स वाईफ बोलवतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, "खरं सांगू तर मला खूप विचित्र वाटतं. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी लोक मला तू आमिरची पत्नी आहेस का असं विचारायचे तेव्हाही मला ते आवडायचं नाही. त्यांना कदाचित माहित नाही की मी नक्की कोण आहे आणि काय काम करते?  मी फक्त आमिरची पत्नी नाही. माझी स्वत:ची वेगळी ओळख आहे."

किरण राव आणि आमिर खानने 2005 मध्ये लग्न केले होते. तब्बल १६ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आजही आमिरच्या मनात किरणबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. या नात्याविषयी किरण म्हणाली, "मी आणि आमिर चांगले मित्र आहोत. मला त्यांच्यासोबत काम करायला आवडतं. लोक आजही मला आमिरची एक्स वाईफ म्हणतात. पण माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाही मी माझ्या स्पेसमध्ये होते. माझे मित्र होते. आमिरने कधीच माझ्या स्पेसमध्ये हस्तक्षेप केला नाही."

'लापता लेडीज' हा किरण रावचा सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. लोकांना हा सिनेमा नक्की आवडेल अशी तिने आशा व्यक्त केली आहे.

Web Title: kiran rao dosent like ex wife tag says i have my own identity also talks about amir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.