किंग खान भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 14:11 IST2016-07-02T08:41:37+5:302016-07-02T14:11:37+5:30
शाहरुख खानची मुलगी सुहानाचे काही दिवसांपूर्वी बिकनीतील फोटो व्हायरल झालेले होते. या बिकनी फोटोवर मीडियात चर्चाही झाली होती. पण ...

किंग खान भडकला
श हरुख खानची मुलगी सुहानाचे काही दिवसांपूर्वी बिकनीतील फोटो व्हायरल झालेले होते. या बिकनी फोटोवर मीडियात चर्चाही झाली होती. पण यावरून शाहरुख खानला प्रचंड राग आला आहे. त्याचे यावर म्हणणे आहे की, माझी मुलगी सुहाना ही केवळ 16 वर्षांची आहे. तिने बिकनी ही समुद्रकिनाऱ्यावर असताना घातली होती आणि त्यावेळी तिचा लहान भाऊही तिच्यासोबत होता. पण काही मीडियातील लोकांनी शाहरुखच्या मुलीने दाखवली आपली बॉडी अशा शीर्षकाच्या बातम्या दाखवल्या होत्या, हे सगळे अतिशय वाईट असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सुहाना ही केवळ माझी मुलगी असल्याने अशाप्रकारची बातमी बनवण्यात आली. इतर कोणत्याही सामान्य मुलीच्या बाबतीत असे घडले नसते. त्यामुळे माझ्या स्टारडमपासून मी माझ्या मुलांना दूरच ठेवायचा नेहमी प्रयत्न करतो असे त्याचे म्हणणे आहे.
![]()