ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय कियारा अडवाणी, फोटो बघून फिदा झाले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 18:24 IST2022-02-19T18:23:40+5:302022-02-19T18:24:44+5:30
Kiara Advani : कियारा अडवाणीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ती ग्रे कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनमधील ड्रेसमध्ये दिसत आहे.

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय कियारा अडवाणी, फोटो बघून फिदा झाले फॅन्स
'कबीर सिंह' सिनेमातून तरूणांच्या मनात करून राहिलेली अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आपल्या लूक्समुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या तिचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. या ती ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
कियारा अडवाणीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ती ग्रे कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनमधील ड्रेसमध्ये दिसत आहे. कियाराने लूक कम्प्लिट करण्यासाठी लाइट मेकअप केलं आणि केस बांधले आहेत. या फोटोत कियारा फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
याआधी कियाराचा बॅकलेस गाउनमधील लूक खूप व्हायरल झाला होता. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. एका व्हिडीओत ती तिची बॅक साइड फ्लॉन्ट करताना दिसली. यात ती कॅमेराकडे बघून पोज देत होती.
लव्ह लाइफबाबत चर्चा
कियारा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या सिनेमापेक्षा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. दोघे अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. पण दोघांनी त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.
कियाराच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत. ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया २' मध्ये दिसणार आहे. त्यासोबतच ती वरूण धवन सोबत 'जुग जुग जियो' मध्ये आणि विक्की कौशलसोबत गोविंदा नाम मेरा मध्ये दिसणार आहे.