कियारा आडवाणीने शाहिद कपूरचे केले 'या' शब्दात कौतुक, म्हणाली असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 13:01 IST2019-02-05T13:00:04+5:302019-02-05T13:01:08+5:30
सध्या कियारा आडवाणी तिचा आगामी सिनेमा 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या अपोझिट दिसणार आहे. कियाराने फगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

कियारा आडवाणीने शाहिद कपूरचे केले 'या' शब्दात कौतुक, म्हणाली असे काही
सध्या कियारा आडवाणी तिचा आगामी सिनेमा 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या अपोझिट दिसणार आहे. कियाराने फगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'एम.एस.धोनी' सिनेमातून यानंतर कियारा लाईमलाईटमध्ये आली ती नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमधल्या बोल्ड भूमिकेमुळे. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय.
मुंबई मिररशी बोलताना कियारा म्हणाली, ''शाहिद कपूरसोबत काम करणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो आपली भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतो. मी त्याच्यासोबत सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. मला साध्या आणि सरळ भूमिका करायला आवडतात.''
'कबीर सिंग'बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपटही संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. काही दिवसांपूर्वीच शाहिदने ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शाहिद आणि कियाराचे चाहते 'कबीर सिंग' चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.