लग्नाचा पहिला वाढदिवस अन् कियाराला पती सिद्धार्थकडून मिळालं 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:09 PM2024-02-13T17:09:51+5:302024-02-13T17:10:32+5:30

सिद्धार्थ आणि कियारा यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Kiara Advani opens up about the special surprise gift she received from Sidharth Malhotra on their first anniversary | लग्नाचा पहिला वाढदिवस अन् कियाराला पती सिद्धार्थकडून मिळालं 'हे' खास गिफ्ट

लग्नाचा पहिला वाढदिवस अन् कियाराला पती सिद्धार्थकडून मिळालं 'हे' खास गिफ्ट

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे.  चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.  एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यात दोघेही मागे पडत नाहीत. कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सिद्धार्थ आणि कियारा यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. एका मुलाखतीत कियाराने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सिद्धार्थने कोणते भेटवस्तू दिली याबाबतचा खुलासा केला.

सिद्धार्थ आणि कियारा रील लाईफसोबतच ही जोडी खऱ्या आयुष्यातही खूप हिट आहे. दोघांनी दुबईतील एका हॉटेलच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने काय गिफ्ट दिलं, असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला. यावर कियारा लाजत म्हणाली, 'खूप सारं प्रेम दिलं'.  तर सिद्धार्थ म्हणाला,  'लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही एक सरप्राईज ट्रिप प्लॅान केली होती. आम्ही दोघेही कामात व्यस्त असतो. त्यामुळे जो वेळ आम्हाला एकत्र घालवायला भेटतो. त्यात आम्ही खूप आनंदी असतो'.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सिद्धार्थची 'इंडियन पोलिस फोर्स' 19 जानेवारी रोजी प्रदर्शित झाली. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. तर 15 मार्च 2024 रोजी त्याचा 'योद्धा'हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कियारा ही 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती 'गेम चेंजर' या सिनेमात अभिनेता राम चरणसोबत झळकणार आहे. 

सिद्धार्थ आणि कियारा हे दोघेही अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सिद्धार्थने रोममध्ये तिला प्रपोज केले होते. यानंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नात लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. 

Web Title: Kiara Advani opens up about the special surprise gift she received from Sidharth Malhotra on their first anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.