प्रेग्नंसीवेळी कियारा अडवाणीच्या हातातून निसटले सिनेमे, आता 'या' फिल्ममेकरसोबत करतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:28 IST2026-02-11T16:27:52+5:302026-02-11T16:28:35+5:30
कियारा अडवाणी महिला प्रधान सिनेमात दिसणार?

प्रेग्नंसीवेळी कियारा अडवाणीच्या हातातून निसटले सिनेमे, आता 'या' फिल्ममेकरसोबत करतेय चर्चा
अभिनेत्री कियारा अडवाणी पुन्हा चर्चेत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचदरम्यान तिचा 'वॉर २' सिनेमा रिलीज झाला. तर आता कियारा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. नवीन फिल्ममेकरसोबत तिने चर्चा सुरु केली आहे. कियाराने लेकीचं नाव सयाराह असं ठेवलं. लेकीच्या जन्मानंतर सात महिन्यांनी कियारा पुन्हा सेटवर दिसत आहे.
प्रेग्नंसीवेळी आणि डिलीव्हरीनंतर कियारा अडवाणीच्या हातून काही सिनेमे निसटले. त्यातलाच एक मॅडॉक फिल्म्सचा 'शक्ती शालिनी' ज्यात आता अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे. तर काही सिनेमांच्या शूटिंग शेड्युलमध्ये बदल केले गेले. मात्र आता कियाराने कमबॅक केलं आहे. कियारा महिला प्रधान सिनेमात झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फिल्ममेकर अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत कियाराची चर्चा सुरु आहे. अश्विनी यांनी 'पंगा', 'नील बटे सन्नाटा' आणि 'बरेली की बर्फी' सारख्या सिनेमांची पटकथा लिहिली आहे. तर आता त्या कियारासोबतच्या या सिनेमाच्या लिखाणाचं काम करत आहेत.
अद्याप कियाराने सिनेमा साईन केलेला नाही. त्यामुळे सिनेमाबद्दल अधिकृत अपडेट आलेलं नाही. सगळं काही सुरळीत झालं तर कियारा अडवाणी हा सिनेमा साईन करुन लवकरच शूटिंगही सुरु करेल.
आई होण्याआधी कियारा अडवाणीने साउथ सुपरस्टार यशसोबतच्या 'टॉक्झिक'चं शूट पूर्ण केलं आहे. त्यामुळे तिचा पुढचा सिनेमा 'टॉक्झिक' असणार आहे जो १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी 'धुरंधर:द रिव्हेंज'ही येणार आहे.