कियारा अडवाणी म्हणाली - तिला 'या' तीन कामात येते शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:01 IST2020-11-06T15:58:36+5:302020-11-06T16:01:25+5:30

सध्या तिचा 'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती सांगत आहे की, अशा तीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या करण्यात तिला शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा येते.

Kiara Advani list out three things she finds better than having a physical relation | कियारा अडवाणी म्हणाली - तिला 'या' तीन कामात येते शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा!

कियारा अडवाणी म्हणाली - तिला 'या' तीन कामात येते शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा!

सुशांत सिंह राजपूतच्या 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून कियारा अडवाणी चर्चेत आली होती. त्यानंतर 'कबीर सिंह' सिनेमातून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आज ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. आता कियाराचा 'लक्ष्मी' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याआधी दोघेही 'गुड न्यूज' सिनेमात दिसले होते. सध्या तिचा 'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती सांगत आहे की, अशा तीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या करण्यात तिला शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा येते.

कियाराचा हा व्हिडीओ 'ट्विक इंडिया'ने शेअर केला आहे. कियारा यात काही मजेदार प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. कियाराला विचारलं गेलं की, तिला जर एखादा कीडा बनण्याची संधी मिळाली तर तिला काय बनायला आवडेल? यावर कियाराने उत्तर दिलं की, तिला अळी व्हायला आवडेल. जेणेकरून ती नंतर फुलपाखरू होऊ शकेल. (बाबो..! लग्नाआधीच कियारा आडवाणीला व्हायचंय प्रेग्नेंट, कारण वाचून व्हाल हैराण)

त्यानंतर कियाराला विचारण्यात आले की अशा तीन कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना शारीरिक संबंधापेक्षाही अधिक चांगल्या मानते? या प्रश्नाचं उत्तर देत कियाराने सांगितले की, शानदार पिझ्जा, शॉपिंग आणि एक चांगला सिनेमा. या तीन गोष्टींना किराया शारीरिक संबंधांपेक्षाही मजेदार आणि चांगल्या मानते. (VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...)

या व्हिडीओत कियाराला पुढे विचारलं जातं की, तिच्या आयुष्यात कधी अशी घटना घडली आहे का ज्यातून ती मरता मरता वाचली? कियाराने अशाच एका घटनेचा उल्लेख केला. कियाराने सांगितले की, जेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा क्लासमेट्ससोबत ती एका ट्रिपवर गेली होती. ट्रिपवर तिच्या रूममध्ये आग लागली होती. तिने सांगितले की, ही फारच भीतीदायक घटना होती. तिला असं वाटलं होतं की, ती आज वाचणार नाही.
 

Web Title: Kiara Advani list out three things she finds better than having a physical relation