कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं ठेवलं हे युनिक नाव, जाणून घ्या नावाचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:34 IST2025-11-28T11:33:43+5:302025-11-28T11:34:53+5:30
Kiara Advani and Sidharth Malhotra Baby Photo: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना १५ जुलैला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं ठेवलं हे युनिक नाव, जाणून घ्या नावाचा अर्थ
Kiara Sidharth Malhotra Baby Name: बॉलिवूडचे लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. हे दोघे नुकतेच पालक झाले आहेत. १५ जुलै रोजी त्यांच्या घरी एका क्युट मुलीचं आगमन झालं आहे. त्यानंतर आता त्यांनी बाळाचं बारसं केलं असून तिचे नाव सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
'शेरशाह'च्या सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी प्रेमात पडले. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या आयुष्यात छोट्या पाहुणीचे आगमन झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान आता त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
सिद्धार्थ आणि कियाराने सोशल मीडियावर त्यांच्या बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, आमच्या प्रार्थनांपासून, आमच्या मिठीपर्यंत! आमचा दैवी आशीर्वाद, आमची राजकुमारी, सरायाह मल्होत्रा (Saraayah Malhotra). त्यांच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
'सरायाह' नावाचा अर्थ काय आहे?
कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या मुलीचे नाव खूपच युनिक ठेवले आहे. सरायाह हा एक हिब्रू शब्द आहे, ज्याचा अर्थ राजकुमारी असा होतो. बायबलमध्येही या शब्दाचा उल्लेख आहे. बायबलनुसार, या शब्दाचा अर्थ यहोवाचा सैनिक असा होतो.
वर्कफ्रंट
कियारा अडवाणी शेवटची 'वॉर २' चित्रपटात झळकली होती, ज्यात तिने हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत काम केले. याशिवाय ती 'शक्ती शालिनी' आणि 'डॉन ३' मध्ये दिसणार होती, पण तिने या दोन्ही सिनेमांमधून माघार घेतली आहे. तर सिद्धार्थ मल्होत्राने देखील त्याच्या पुढील चित्रपटावर काम सुरू केले आहे. 'वॅन' नावाच्या या चित्रपटात तो तमन्ना भाटियासोबत दिसणार आहे. तसेच, तो सैफ अली खानसोबत 'रेव्ह ४'मध्ये दिसणार असल्याचं बोललं जातंय.