खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 18:30 IST2018-08-23T18:28:33+5:302018-08-23T18:30:03+5:30
आपल्या हटके लुक्ससाठी जान्हवी कपूरपेक्षा तिची लहान बहिण खुशी कपूर नेहमी चर्चेत असते. पाहूयात डिझायनर ड्रेसेसमधलं खुशूचे हॉट लुक्स...

खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील!
सध्या स्टार किड्समध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुलींची. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघींची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर असतात. पण आपल्या हटके लुक्ससाठी जान्हवी कपूरपेक्षा तिची लहान बहिण खुशी कपूर नेहमी चर्चेत असते. पाहूयात डिझायनर ड्रेसेसमधलं खुशूचे हॉट लुक्स...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राच्या पार्टीमध्ये खुशीने शिमरी लुकचा गोल्डन कलरचा मिनी ड्रेस घातला होता. पायांमध्ये मॅचिंग स्ट्रेपी हिल्समध्ये तिचा लूक फार छान दिसत होता.
मागील काही दिवसांमध्ये एका फॅमिली वेडिंगमध्ये खुशीने लेहंगा घातला होता. डिझायनर फाल्गुनी शेन पिकॉकने डिझाइन केलेला या लेहेंग्यामध्ये खुशी फार सुंदर दिसत होती.
या सुंदर रेड कलरच्या ड्रेसमध्ये खुशी फार सुंदर दिसत आहे. हा ड्रेस खुशीने जान्हवीच्या प्रमोशनच्यावेळी घातला होता.
मनीष मल्होत्राच्या या फॅशनेबल शीर आउटफिटमध्ये खुशी फार हॉट दिसत आहे.