खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, याबाबत जान्हवी म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:20 IST2019-04-08T20:20:00+5:302019-04-08T20:20:00+5:30
जान्हवीची छोटी बहिण खुशी कपूरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, याबाबत जान्हवी म्हणाली....
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीने २०१८ साली 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून जान्हवीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आता जान्हवीची छोटी बहिण खुशी कपूरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. याबाबतचा खुलासा जान्हवीने नुकताच केला आहे.
अनीता श्रॉफ यांच्या चॅट शोमध्ये जान्हवीने सांगितले की, 'खुशी कपूर न्यूयॉर्कमधील फिल्म अॅकाडमीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत विचार करणार आहे.'
बोनी कपूरचे आपल्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम आहे. त्यामुळे खुशी न्यूयॉर्कला जाणार असल्याचे समजल्यावर माझ्या मनावर खूप दडपण आले आहे. तर पप्पा फक्त तिचा विचार करूनच रडू लागतील. जान्हवी व खुशीमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि ते एकत्र खूप एन्जॉय करतात. याबाबत जान्हवी म्हणाली, 'आमच्यात भांडणे फक्त तेव्हा होतात जेव्हा खुशी माझे कपडे चोरून घालते. आम्ही कपडे शेअर करतो. पण तिने मला सांगितले पाहिजे. जर तिने न सांगता गपचुप माझे कपडे वापरले की आमच्यात भांडणे होतात.'
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल सांगायचे तर ती सध्या 'कारगिल गर्ल' चित्रपटाचे चित्रीकरण करते आहे. या चित्रपटात ती गुंजन सक्सेनाची भूमिका करताना दिसणार आहे आणि या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करणार आहेत आणि या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.