खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:20 IST2025-01-28T10:16:30+5:302025-01-28T10:20:02+5:30
खुशी कपूरने 'द आर्चीज' (The Archies Movie) सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता ती लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'लवयापा' (Loveyapa Movie) या चित्रपटात दिसणार आहे.

खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..."
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी(Shridevi)च्या दोन्ही मुली जान्हवी (Janhavi Kapoor) आणि खुशी (Khushi Kapoor) यांनीदेखील आईच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. खुशी कपूरने 'द आर्चीज' (The Archies Movie) सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता ती लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'लवयापा' (Loveyapa Movie) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान खुशी कपूरने नाकाची सर्जरी आणि ओठांच्या फिलर्ससोबत कॉस्मेटिक सर्जरी करण्याच्या निर्णयावर मोकळेपणाने बोलली.
जोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री खुशी कपूर हिने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत खासगी अनुभव आणि ब्युटी इंडस्ट्रीवर भाष्य केले. व्हिडिओमध्ये, खुशीने तिच्या आयुष्याची एक झलक दाखवली. तिने तिच्या घरातील स्विमिंग पूल दाखवला, ज्यावर तिच्या पाच कुत्र्यांना डुबकी मारण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड देखील आहे. मुलाखतीदरम्यान, तिच्या बालपणाबद्दल देखील चर्चा झाली ज्यामध्ये खुशीने स्वतःला लक्ष वेधणारी म्हणून वर्णन केले.
कॉस्मेटिक सर्जरीबद्दल खुशी म्हणाली...
खुशीला कॉस्मेटिक सर्जरी करून सार्वजनिक ठिकाणी जाण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले. ती म्हणाली की, ''मला वाटत नाही की ही इतकी मोठी गोष्ट आहे. मला प्लास्टिक हा शब्द अपमान वाटत नाही. मला काही फरक पडत नाही. ही वैयक्तिक निवड आहे आणि मी त्यात कम्फर्टेबल आहे.''
जुना व्हिडीओ पाहून लोकांनी केलं होतं ट्रोल
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, तिने तिच्या बालपणीच्या एका जुन्या व्हिडिओवर तिची प्रतिक्रिया दिली होती ज्यामध्ये ती तिची आई श्रीदेवीसोबत एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसली होती आणि यामुळे तिच्या आताच्या ट्रान्सफॉर्मेशनवर खूप चर्चा झाली होती. खुशीने याविषयी बोलताना सांगितले की, तिला तिच्या प्रवासाबाबत पारदर्शक राहायचे आहे. ती म्हणाली की, 'माझं करिअर सुरू होण्याआधीच लोकांनी माझ्याबद्दल गृहीतकं बांधली होती. त्यापैकी बहुतेक नकारात्मक होती. मी त्याकडे दुर्लक्ष करायला आणि प्रामाणिक राहण्यावर लक्ष केंद्रित करणे शिकले आहे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, खुशी लवकरच आमिर खान आणि रिना दत्ताचा मुलगा जुनैद खानसोबत आगामी 'लवयापा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.