वीर पहाडिया-तारा सुतारियाच नाही तर 'या' स्टारकिड जोडीचंही ब्रेकअप, २ वर्षांचं नातं संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:40 IST2026-01-09T11:39:15+5:302026-01-09T11:40:10+5:30
बॉलिवूडमध्ये 'ब्रेकअप'ची लाट?

वीर पहाडिया-तारा सुतारियाच नाही तर 'या' स्टारकिड जोडीचंही ब्रेकअप, २ वर्षांचं नातं संपलं
'द आर्चीज' सिनेमातील नवोदित कलाकार खुशी कपूर आणि वेदांग रैना दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक इव्हेंट्समध्ये दोघंही हातात हात घालून यायचे. मात्र आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. त्यांचं दोन वर्षांचं नातं संपवलं आहे. लव्हबर्ड्सच्या ब्रेकअपने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
खुशी ही निर्माते बोनी कपूर यांची धाकटी लेक आहे. तिची मोठी बहीण जान्हवी कपूर जी काही वर्षांपासून बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत आहे. दोघीही बहिणी अनेकदा आपापल्या बॉयफ्रेंडसोबत डबल डेटवर दिसल्या आहेत. मात्र आता खुशी आणि वेदांगने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मनोरंजन पत्रकार विकी ललवानी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 'विकी आणि खुशी आता कपल नाहीत, दोघांचं ब्रेकअप झालं आहे. यामागचं कारण समोर आलेलं नाही.'
वेदांग आणि खुशीने कधीच एकमेकांसोबतचं नातं कन्फर्म केलं नव्हतं. एका मुलाखतीत वेदांग म्हणाला होता की, "आम्ही दोघंही खूप चांगले मित्र आहोत. आमचा स्ट्राँग बाँड आहे. बऱ्याच काळापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि अनेक गोष्टींवर कनेक्टेड असतो."
खुशी आणि वेदांगचा 'द आर्चीज' २०२३ साली आला होता. यामध्ये सुहाना खान आणि अगस्त्य नंदाही होते. हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सर्व स्टारकिड्स दिसले होते.