संजय दत्तला खलनायकच्या सीक्वलसाठी हवायं बॉलिवूडचा हा अभिनेता, 200 किलो वजन उचल्यामुळे आला होता चर्तेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:17 IST2019-09-20T15:16:53+5:302019-09-20T15:17:12+5:30
संजू बाबाने नुकतेच आपलं प्रोडक्शन हाऊस लाँच केले आहे. ज्याचे नाव दत्त प्रोडक्शन्स आहे. या अंतर्गत प्रस्थानम सिनेमा तयार करण्यात आला.

संजय दत्तला खलनायकच्या सीक्वलसाठी हवायं बॉलिवूडचा हा अभिनेता, 200 किलो वजन उचल्यामुळे आला होता चर्तेत
संजू बाबाने नुकतेच आपलं प्रोडक्शन हाऊस लाँच केले आहे. ज्याचे नाव दत्त प्रोडक्शन्स आहे. या अंतर्गत प्रस्थानम सिनेमा तयार करण्यात आला. त्यानंतर संजय दत्त आता आणखी एक सिनेमा बनवण्याची तयारी करतो आहे.
राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार 1993मध्ये आलेल्या खलनायक सिनेमाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु आहे.संजय दत्तला या सिनेमात टायगरला कास्ट करायचे आहे. खलनायकचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. त्यामुळे या सिनेमाचा जर सीक्वल बनवण्याचा विचार सुरु असेल तर त्याचे राईट्स सुभाष घई यांच्याकडून खरेदी करावं लागतील. रिपोर्टनुसार खलनायकचे राईट्स अजून कुणालाचं सुभाष घईनी दिलेले नाहीत.
अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी सिनेमा 'वॉर'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमात टायगरसोबत ऋतिक रोशनची मुख्य भूमिका आहेत. टायगरचा वॉर सिनेमा गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे.
या सिनेमाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता की, ‘भारतात आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या अॅक्शनपटांपेक्षा सर्वोत्तम अॅक्शनपट आम्हाला तयार करायचा होता. आतापर्यंत जगाने पाहिले नसतील असे अॅक्शन सीन डिझाइन केले जावे यासाठी पहिल्यांदा आम्ही जगातील दोन बड्या अॅॅक्शन कोरिओग्राफरना एकत्र आणले आहे.