केजरीवाल यांनी पाहिला ‘नीरजा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 08:15 IST2016-02-18T15:15:03+5:302016-02-18T08:15:03+5:30
सोनम कपूरचे तारे सध्या तेजोमान आहेत. तिकडे बिग बी, करण जोहर तिच्या अभिनयाची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत, ...

केजरीवाल यांनी पाहिला ‘नीरजा’
स नम कपूरचे तारे सध्या तेजोमान आहेत. तिकडे बिग बी, करण जोहर तिच्या अभिनयाची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तोच आता तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये आणखी एक नाव सामाविष्ट झाले आहे, असे म्हणावे लागेल.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रदर्शना आधीच ‘नीरजा’ चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी केजरीवालांसाठी दिल्लीमध्ये एका स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.
![soanam]()
यावेळी संगीतकार आणि चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणारा शेखर राविजियानी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि ‘आप’चे नेते कुमार विश्वास हेदेखील उपस्थित होते.
राम माधवानी दिग्दर्शित हा चित्रपट फ्लाईट अटेंडंट नीरजा भनोतच्या जीवनावर आधारित आहे. शबाना आझमी नीरजाच्या आईच्या भूमिकेत आहे.
![soanm]()