साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:52 PM2023-07-18T18:52:21+5:302023-07-18T18:54:49+5:30

कीर्ती सुरेशने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

keerthy suresh to make her bollywood debut with varun dhawan | साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी!

साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी!

googlenewsNext

साऊथ  इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh)बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची बातमी समोर आली आहे. कीर्ती सुरेशने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की कीर्ती सुरेशने तिचा पहिला हिंदी चित्रपट साइन केला आहे आणि ती अभिनेता वरुण धवनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कीर्ती सुरेश ज्या चित्रपटातून बॉलिवूड करत आहे तो चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार बनवत असल्याचे सांगितले जात आहे.


'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार कीर्ती सुरेश बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. कीर्ती सुरेश तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कॅलिस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट आहे. कीर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होती आणि अखेर तिचा शोध संपला. कॅलिस दिग्दर्शित हा चित्रपट कीर्ती सुरेशने साइन केला असून या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात मुंबईत सुरू होणार असून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 31 मे रोजी रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. कीर्ती सुरेशचा पहिला बॉलिवूड चित्रपट अ‍ॅटली कुमार निर्मित करत आहे.

विशेष म्हणजे, वरुण धवनचा हा चित्रपट दक्षिणेकडील स्टार थलपती विजयच्या 'थेरी' या हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचा दावा यापूर्वी रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. थेरी चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले होते. आता वरुण धवन आणि कीर्ती सुरेश यांच्या या चित्रपटाचे नाव काय आहे आणि त्याची कथा काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: keerthy suresh to make her bollywood debut with varun dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.