केदारनाथ चित्रपटाची शूटिंग बंद नाही झाली हा घ्या पुरावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 12:51 IST2018-02-24T07:21:47+5:302018-02-24T12:51:47+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सारा अली खानचा चित्रपट वादाचा भवऱ्यात सापडला आहे. ज्यानंतर अशी चर्चा होती का साराचा पहिला चित्रपट रिलीज होऊ शकत नाही..

Kedarnath film shooting has not stopped! | केदारनाथ चित्रपटाची शूटिंग बंद नाही झाली हा घ्या पुरावा !

केदारनाथ चित्रपटाची शूटिंग बंद नाही झाली हा घ्या पुरावा !

ल्या अनेक दिवसांपासून सारा अली खानचा चित्रपट वादाचा भवऱ्यात सापडला आहे. ज्यानंतर अशी चर्चा होती का साराचा पहिला चित्रपट रिलीज होऊ शकत नाही.. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि प्रॉडक्शन हाऊस KriArj Entertainmentदरम्यान रिलीज डेटवरून मतभेद निर्माण झाले होते. यामुळे चित्रपटाचे शूटींग अर्ध्यात रोखण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच, डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंता मात्र वाढली होती.

काही दिवसांपूर्वी अभिषेक कपूरने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती कि चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरु झाला आहे. काही तासांपूर्वीच अभिषेकने सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांने कॅप्शन लिहिले आहे, जय शिव संभू !   

मध्यंतरी  ‘केदारनाथ’चे शूटींग थांबवण्यात आल्यामुळे साराने  प्लान- बी तयार केला होता. केदारनाथ’च्या नादात साराने अनेक बड्या चित्रपटांच्या आॅफर्स धुडकावून लावल्या होत्या. पण आता ‘केदारनाथ’चे भविष्य असे अधांतरी दिसत असल्याचे पाहून यापैकी  एका चित्रपटाची आॅफर सारा स्वीकारणार असल्याची खबर होती.

ALSO READ :  बॉलिवूड डेब्यूपूर्वीच सैफची लेक सारा अली खान दाखवू लागली तोरा! सात चित्रपटांना दिला नकार!!

सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट केदारनाथ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे.
 

Web Title: Kedarnath film shooting has not stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.