सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 13:58 IST2018-12-09T13:57:25+5:302018-12-09T13:58:30+5:30

समीक्षकांनी ‘केदारनाथ’ला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा चांगलाच भावला आहे. विशेषत: सारा अलीच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

kedarnath box office update sara ali khan film collects rs 17 cr in 2 day | सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!!

सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!!

ठळक मुद्दे‘केदारनाथ’च्या रिलीजनंतर सारा जाम खूश आहे. ‘केदारनाथ’ रिलीज झाल्या झाल्या सारा मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात दर्शनाला पोहोचली. साराने मंदिरात पूजाअर्चा केली. शिवाय मंदिराबाहेरच्या गरिबांना अन्नदानही केले.

सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. होय, ३५ कोटी खर्चून बनलेल्या या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत १७ कोटींची कमाई केली आहे. येत्या दिवसांत ‘केदारनाथ’ बॉक्स ऑफिसवर आणखी चांगले प्रदर्शन करणे अपेक्षित आहेत.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७ कोटी रूपये कमावले. दुस-या दिवशी या कमाईत ३४ टक्के वाढ होत या चित्रपटाने ९.७५ कोटींचा गल्ला जमवला. समीक्षकांनी ‘केदारनाथ’ला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा चांगलाच भावला आहे. विशेषत: सारा अलीच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. अनेकांनी तिची तुलना तिची आई अमृता सिंगसोबत केली आहे.
‘केदारनाथ’च्या रिलीजनंतर सारा जाम खूश आहे. ‘केदारनाथ’ रिलीज झाल्या झाल्या सारा मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात दर्शनाला पोहोचली.

साराने मंदिरात पूजाअर्चा केली. शिवाय मंदिराबाहेरच्या गरिबांना अन्नदानही केले.

‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ साली केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आला आहे. तांत्रिक मदतीने या महाप्रलयाची अनेक विध्वंसक दृश्य चित्रपटात जिवंत करण्यात आली आहेत. 
‘केदारनाथ’नंतर सारा अली खानचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ प्रदर्शनास सज्ज आहे. येत्या २७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात सारा रणवीर सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीज झालेय. त्याला पे्रक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. एकंदर काय तर साराचे भविष्य उज्ज्वल आहे, असे मानले जातेय. तुमचेही याबद्दल दुमत नसावे.
 

Web Title: kedarnath box office update sara ali khan film collects rs 17 cr in 2 day