अमिताभ बच्चन यांनी 'हा' पदार्थ खाणं पूर्णपणे केलं बंद, KBC 16 मध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:15 IST2025-02-25T14:15:07+5:302025-02-25T14:15:44+5:30

'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकाशी बोलताना एक पदार्थ पूर्णपणे खाणं बंद केल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केलाय.

Kaun Banega Crorepati 16 Host Amitabh Bachchan Reveals He Quits Rice | अमिताभ बच्चन यांनी 'हा' पदार्थ खाणं पूर्णपणे केलं बंद, KBC 16 मध्ये खुलासा

अमिताभ बच्चन यांनी 'हा' पदार्थ खाणं पूर्णपणे केलं बंद, KBC 16 मध्ये खुलासा

Amitabh Bachchan: 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 16) हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालत आहे. सध्या या कार्यक्रमाचा १६ वा सीझन सुरू आहे.  महत्त्वाचे म्हणजे पहिल्या सीझनपासून अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या मंचावर होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्पर्धकांशी संवाद साधतात. स्पर्धकांशी बोलताना अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातीलही काही खास किस्से आणि काही गोष्टी उलगडत असतात. यंदा 'KBC 16' च्या एका भागात असाच एक क्षण पाहायला मिळाला. स्पर्धकाशी बोलताना आपण एक पदार्थ पूर्णपणे खाणं बंद केल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केलाय.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'KBC 16'च्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर चांदनी चौधरी स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना "अवधी जेवणातील 'तहरी' हा पदार्थ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?" असा प्रश्न ३ हजार रुपयांसाठी विचारला गेला. यावर चांदनी यांनी 'उत्तर प्रदेश' असं उत्तर दिलं. हे उत्तर योग्य होतं. याबद्दल अधिक माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, "तहरी' हा एक तांदळापासून बनवण्यात येतो. बिर्याणीसारखाच हा पदार्थ असतो. पण, थोडं वेगळ्या पद्धतीनं याला बनवलं जातं". पुढे अमिताभ बच्चन यांनी त्यांना 'तहरी' पदार्थ  खूप आवडायचा. पण आता भात खाणं पूर्णपणे बंद (Kbc 16 Host Amitabh-bachchan Quits Rice) केल्याचा खुलासा त्यांनी केला.

अमिताभ बच्चन यांचं वय हे ८२ वर्ष आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ हे सुरुवातीच्या काळात जितके सक्रिय होते, आजही तितकेच सक्रिय आहेत. संतुलित आहार हे त्यांच्या निरोगी आयुष्याचे एक मोठे कारण आहे. अमिताभ बच्चन यांचा आहार साधेपणा आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या उर्जेने आणि फिटनेसने लोकांना प्रेरणा देतात. आपल्या आहाराचेही ते काटेकोरपणे पालन करतात. फिटनेस आणि आरोग्याबाबत शिस्तबद्ध जीवनशैली त्यांनी स्वीकारली आहे.

Web Title: Kaun Banega Crorepati 16 Host Amitabh Bachchan Reveals He Quits Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.