जेव्हा फ्रिजमध्ये जाऊन बसले अमिताभ बच्चन अन् मग ते बाहेरून बंद झालं, नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:13 IST2025-02-04T11:12:50+5:302025-02-04T11:13:32+5:30
अमिताभ हे एकदा चक्क फ्रीजमध्ये बंद झाले होते.

जेव्हा फ्रिजमध्ये जाऊन बसले अमिताभ बच्चन अन् मग ते बाहेरून बंद झालं, नेमकं काय घडलं होतं?
Kaun Banega Crorepati 16: सध्या अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या KBC १६ ची चांगलीच चर्चा आहे. बिग बी पुन्हा एकदा त्याच सळसळत्या एनर्जीत KBC १६ चं होस्टिंग करत आहेत. या कार्यक्रमात स्पर्धकांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से सांगत असतात. नुकतंच एक मनोरंजक किस्सा त्यांनी सांगितला.
आता कौन बनेगा करोडपतीमध्ये ज्युनियर आठवडा सुरू झाला आहे. हॉट सीटवर बसलेल्या प्रणूषा ठमकेला अमिताभ यांनी फ्रिजचा फोटो दाखवला आणि प्रश्न विचारला की यापैकी कोणती वस्तू फ्रिजमध्ये ठेवली आहे. यावर A- फुटबॉल, B- दूध, C- घड्याळ आणि D- कानातले, असे चार पर्याय देण्यात आले. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते - दूध. तिनं योग्य उत्तर दिल्यानंतर अमिताभ यांनी फ्रिजशी संबंधित त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला. अमिताभ हे एकदा चक्क फ्रीजमध्ये बंद ( Amitabh Bachchan Locked In A Refrigerator In Childhood) झाले होते.
अमिताभ म्हणाले, "बालपणी प्रश्न पडायचा की हे काय नेमकं आहे. जेव्हा आम्ही अलाहाबादमध्ये राहत होतो. आमच्याकडे एसी इत्यादी सुविधा नव्हत्या. घरात एक मोठा फ्रिज आणला होता. मी तो उघडला तेव्हा मला दिसलं की ते खूप थंड होते. एके दिवशी त्यात जाऊन बसलो. कोणालाही सांगितले नाही आणि दार बंद झालं. ते दार बाहेरून उघडलं जातं, आतून उघडत नाही. मी ओरडल्यानंतर मला बाहेर काढलं गेलं पण, मग मला खूप मार बसला".