​कॅटरिना कुणाला मिस करतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 10:15 IST2016-10-29T19:42:04+5:302016-10-30T10:15:56+5:30

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ सध्या आपल्या आवडत्या छंदाला मिस करतेय असे दिसतेय. तिचा हा छंद म्हणजे बाईक रायडिंग. ...

Katrina is missing someone! | ​कॅटरिना कुणाला मिस करतेय!

​कॅटरिना कुणाला मिस करतेय!

ong>बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ सध्या आपल्या आवडत्या छंदाला मिस करतेय असे दिसतेय. तिचा हा छंद म्हणजे बाईक रायडिंग. रिल नव्हे रिअल लाईफमध्ये देखील तिला बाईक चालवायला आवडते. मात्र, सध्या व्यस्त शेड्यूलमुळे तिला आपला हा छंद पूर्ण करता येत नाही. याची खंत तिने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 

कॅटरिनाने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. यात ती बाईक चालविताना दिसते. हा फोटो जुना असला तरी देखील तिला बाईक रायडिंग मिस करीत असल्याचे तिने फोटो ओळीत म्हटले आहे. ‘मला बाईक रायडिंगचे किती प्रेम होते! मी बºयाच दिवसांपासून बाईकवर बसलेच नाही’ असे तिने फोटो ओळीत लिहिलेय. 



या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची बरसातच केली. सर्वच जण तिला तिच्या छंदाविषयी विचारू लागले. पुन्हा तू आम्हाला बाईक चालविताना पडद्यावर दिसणार आहेस का? असा सवाल केला, तर कुणी तिला आगामी ‘टायगर जिंदा है’ मध्ये तू बाईक चालविणार आहेस की बाईकवर स्टंट करणार आहेस? असाही प्रश्न केला आहे. 

आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात कॅटरिना सलमानच्या अपोझिट पहायला मिळणार आहे. या चित्रपटात दोघेही गुप्तहेराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. कॅटरिना यापूर्वी अनेक चित्रपटात बाईक चालविताना दिसली आहे. ‘जिंदगी ना मिलेंगी दोबारा’ या चित्रपटात तिने केलेली बाईक रायडिंग अनेकांना पसंत पडली होती. आता कॅटने बाईक रायडिंगचा फोटो अपलोड करून अनेकांना त्याची आठवण करून दिली आहे. 

Web Title: Katrina is missing someone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.