​कॅटरिना ठेवतेय रणबीरला ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 13:01 IST2016-04-19T07:31:16+5:302016-04-19T13:01:16+5:30

बॉलिवूड क्युट कपल रणबर-कॅट यांच्या बे्रक अपला आता चार महिने झाले आहेत. दोघांच्या वेगळे होण्यामुळे जर सर्वात जास्त कोणाला ...

Katrina keeps Ranbir waiting | ​कॅटरिना ठेवतेय रणबीरला ताटकळत

​कॅटरिना ठेवतेय रणबीरला ताटकळत

लिवूड क्युट कपल रणबर-कॅट यांच्या बे्रक अपला आता चार महिने झाले आहेत. दोघांच्या वेगळे होण्यामुळे जर सर्वात जास्त कोणाला त्रास होत असेल तर ते म्हणजे ‘जग्गा जासूस’ सिनेमाच्या निर्मात्यांना.

दोघे एकमेकांसोबत एकही क्षण थांबू इच्छित नाहीए. गेल्या शनिवारी चित्रपटाची शुटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होती. रणबीर सेटवर वेळेवर पोहचला. मात्र कॅटरिना मॅडम सेटवर आल्याच नाही.

ती तयारी करून येईपर्यंत दुपारचे तीन वाजले. तोपर्यंत रणबीरला सेटवर ताटकळत बसावे लागले. आता कॅटने हे मुद्दाम केले की नाही याबाबत खात्रीने काही सांगू शकत नाही.

पण, सेटवरील लोकांच्या मते दोघे केवळ सीनसाठी एकत्र येतात. इतर वेळी आपापल्या वॅनिटी व्हॅनमध्ये बसलेले असतात. एवढेच नाही तर चित्रपटाची काही शुटिंग मोरोक्कोला करणे आहे. कॅट म्हणतेय की ती मोरोक्कोला जाणार नाही.

तिची मनधरणी करता करता निर्माता-दिग्दर्शक अनुराग बसूच्या नाकी नऊ आले आहेत.

Web Title: Katrina keeps Ranbir waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.