कॅटरिना कैफची बहीण इसाबेल आत्तापासून दाखवू लागलीयं अॅटिट्यूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 15:30 IST2018-01-12T09:59:40+5:302018-01-12T15:30:06+5:30
कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. कॅटरिना कैफही बहिणीच्या लॉन्चिंगसाठी जीवतोड मेहनत घेतेय. ...

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल आत्तापासून दाखवू लागलीयं अॅटिट्यूट!
क टरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. कॅटरिना कैफही बहिणीच्या लॉन्चिंगसाठी जीवतोड मेहनत घेतेय. अगदी कथित बॉयफ्रेन्ड सलमान खानची मदत घेण्यापासून तर सगळे सगळे कॅट करतेय. खरे तर इसाबेल गेल्या एक-दोन वर्षांपासून बॉलिवूडकडे डोळे लावून बसली होती. पण प्रत्येकवेळी तिच्या पदरी निराशाच पडली. आता सलमानच्या पुण्याईने का म्हणा ना, इसाबेला मोठ्या मुश्किलीने एका भारतातील एका पॉप्युलर कॉस्मेटिक ब्रॅण्डची जाहिरात मिळाली. आतापर्यंत कॅटरिना, श्रद्धा कपूर, करिना कपूर असे सगळे या ब्रॅण्डचा चेहरा राहिलेय. याच ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी अलीकडे इसाबेल मीडियासमोर आली. पण मीडियासोबतच्या पहिल्याच भेटीत इसाबेलचे नखरे पाहून सगळेच जण चाट पडलेत. मॅडमने इलेक्ट्रॉनिक मीडियाला तर मुलाखत दिली पण प्रिंटच्या कुठल्याही रिपोर्टरसोबत बोलण्यास चक्क नकार दिला. मला बॉलिवूडशी संबंधित कुठलाही प्रश्न विचारू नका. मी केवळ या इव्हेंटशी संबंधित प्रश्नांचीच उत्तरे देईल, असे अगदी तोºयात तिने आधीच जाहिर करून टाकले. अन् यानंतर प्रिंट मीडियाशी न बोलताच इव्हेंटमधून चालती झाली. त्यापूर्वी लाईट अरेंजमेंटवरूनही तिने नको तो ड्रामा केला. तिला म्हणे, नॅचरल डे लाईटमध्ये शूट करायचे होते. त्यावरून ती इतकी जिद्दीस पेटली की, टीमच्या नाकीनऊ आले.
एकंदर काय तर पहिला चित्रपट मिळण्याआधीच इसाबेल स्टार झालीय. आता तिचे हे सलमानच्या पुण्याईने मिळालेले ‘स्टारपण’ किती दिवस टिकते, ते बघूच.
ALSO READ : SEE PICS : सौंदर्यात कॅटरिना कैफलाही धोबीपछाड देईल तिची धाकटी बहीण इसाबेल!
२०१४ मध्ये इसाबेल बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आली होती. परंतु त्यावेळी तिला यश मिळाले नव्हते. आता तिने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. पण या वाटचालीच्या सुरवातीला इसाबेल तोरा दाखवणार असेल तर मग सगळेच कठीण आहे.काही दिवसांपूर्वीच इसाबेला बहीण कॅटरिना कैफसोबत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत बघावयास मिळाली होती. यावेळी तिने कॅमेºयाला पोझही दिल्या होत्या.